IMPIMP

Pune Crime | 17 वर्षीय मुलीच्या गळ्याचा रिक्षाचालकाने घेतला चावा, शरिराशी झटून केलं घृणास्पद कृत्य

by nagesh
Pune Crime | Rickshaw driver bites 17 year old girls neck commits heinous act kondhwa police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | क्लासवरुन रिक्षाने घरी परत जाणार्‍या अल्पवयीन मुलीला दुसरीकडे नेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता या मुलीने त्याला प्रतिकार केला. तेव्हा रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) तिच्या गळ्याला चावा घेऊन शरिराशी झटून तिच विनयभंग (Molestation Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी गोकुळनगरमध्ये (Gokul Nagar, Kondhwa) राहणार्‍या मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६३/२२) दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे (Crime Against Woman). हा प्रकार टिळेकरनगर रोड ते इस्कॉन टेम्पलकडे (Tilekarnagar Road to ISKCON Temple) जाणार्‍या रोडजवळ मेट्रो ग्रीन सोसायटीजवळ शनिवारी रात्री अकरा वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी क्लास संपल्यानंतर टिळेकरनगर येथून रिक्षाने येत होती. रिक्षाचालकाने तिला गोकुळनगर चौकात न सोडता ती इस्कॉन टेम्पलकडे जाणार्‍या रोडवर घेऊन जाऊन वाटेत रिक्षा थांबविली मुलीला मिठी मारली. त्याला मुलीने प्रतिकार केला असता त्याने तिच्या गळ्याला चावा घेतला. तिचा हात पकडून शरीराला नको ते स्पर्श करीत तिचा विनयभंग करुन पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Rickshaw driver bites 17 year old girls neck commits heinous act kondhwa police station

हे देखील वाचा :

Neem Juice Benefits | उन्हाळ्यात प्या कडुलिंबाचा ज्यूस, रोज प्यायल्याने दूर होतील ‘हे’ आजार; जाणून घ्या

LIC Housing Finance Limited Loan | कमी दरात गृह कर्ज घेण्याच्या विचारात आहात ?; मग ‘LIC’ ची योजना जाणून घ्या

LIC Jeevan Anand Policy | रोज 100 रुपयांपेक्षा कमी जमा करून मिळवा 10 लाखापेक्षा जास्त फंड, काय आहे पॉलिसीचे डिटेल्स ?

Related Posts