IMPIMP

Pune Crime | शिरुरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेल चालक, मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका

by nagesh
Pune Crime | Scandal of prostitution in shirur Hotelier, manager arrested

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | शिरुर तालुक्यातील (shirur) लॉजवर ग्रामीण पोलीस दलातील भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड (Pune Crime) केले आहे.  महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्‍या हॉटेलचालक व मॅनेजरला अटक करुन तीन महिलांची सुटका केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ओम साई लॉचचा चालक पारस बस्तीमल परमार आणि मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप (दोघे रा. ओम साई लॉज, सरदवाडी, ता. शिरुर) अशी या दोघांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे ओम साई हॉटेल लॉज येथील मॅनेजर व लॉजचालक हे महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांना मिळाली.

त्यांनी महिला भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख यांना कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी ओम साई लॉजवर एक बनावट ग्राहक पाठविला. बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकून मॅनेजर व चालकाला ताब्यात घेऊन तेथे वेश्या व्यवसाय करणार्‍या तीन महिलांची सुटका केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, सहायक फौजदार शब्बीर पठाण, तुषार पंधारे, हवालदार सचिन घाडगे, जनार्धन शेळके, राजु मोमीन, मुकेश कदम पोलीस अंमलदार मंगेश थिगळे, अजित भुजबळ, पूनम गुंड  यांनी केली आहे.

Web Title : Pune Crime | Scandal of prostitution in shirur Hotelier, manager arrested

हे देखील वाचा :

Navi Mumbai Crime | धक्कादायक ! नवी मुंबईत कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या; आत्महत्या केल्याचे 15 वर्षाच्या मुलीने भासवले

Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील कचरा व्यवस्थापन पालिकेपुढील ‘आव्हान’; ‘पर्याय’ सुचविण्याचे ‘आवाहन’

Pune Crime | कर्वेनगरमधील सराईत गुंडाला केले तडीपार

Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mahavikas Aghadi | …तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही; काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा

Related Posts