IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शस्त्रक्रियेद्वारे गुघड्याखाली कापलेला पाय टाकला कचरा पेटीत, डॉक्टरासह आयावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | A case has been registered in the Hadapsar police station against the doctor and the staff in the case of the death of a psychiatric patient

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | निकामी झालेला गुडघ्या खालचा पाय डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे कापून काढला. त्यानंतर या पायाची योग्य विल्हेवाट न लावता तो पाय चक्क कचरा पेटीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

डॉ. अजय धोंडीभाऊ मते (Dr. Ajay Dhondiba Mate) आणि सुनिता जाधव (Sunita Jadhav) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील कचरा डेपोत २२ सप्टेंबर रोजी घडली (Pune Crime) होती.

वारुळवाडी येथील कचरा डेपोत एक मानवी पाय मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.
नारायणगाव पोलिसांनी त्याचा तपास केल्यावर हा प्रकार डॉ. अजय मते यांच्या हॉस्पिटलमध्ये घडल्याची माहिती मिळाली.
डॉ. मते हॉस्पिटल येथे एक रुग्ण दाखल झाला होता.
या रुग्णावर उपचार चालू होते.
या रुग्णाचा सडलेला व निकामी झालेला डावा पाय हा डॉ. मते यांनी शस्त्रक्रियेद्वारे गुडघ्याचे खाली नळीपासून कट करण्यात आला होता.
शस्त्रक्रियेनंतर कापलेला पायाची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असताना तेथील डॉ. अजय मते यांनी लक्ष न देता व निष्काळजीपणे तेथील मावशी सुनिता जाधव यांनी हा मानवी पाय कचर्‍यामध्ये टाकून दिला होता.
तपासात हा प्रकार निषन्न झाल्यानंतर हवालदार पोपट मोहरे यांनी फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | Shocking incident in Pune! The leg amputated under the knee by the surgeon was dumped in the trash, with the doctor filing a case against the mother

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | …म्हणून त्यावेळी पुणेकरांनी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका केली (व्हिडीओ)

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

Related Posts