IMPIMP

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलतेंना बळजबरीने दिली 50000 ची ‘लाच’, दौंडमधील दत्तात्रय पिंगळे आणि मांजरीतील अमित कांदेला ACB कडून अटक

by bali123
Pune Crime | Tehsildar of Haveli Trupti Kolte was forcibly given a bribe of Rs 50,000. ACB arrests Dattatraya Pingale in Daund and Amit Kande in Manjari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पकलेला वाळूचा ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार यांना जबरदस्तीने ऑनलाईन लाच देण्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते (Haveli Tehsildar Trupti Kolte) यांनी चोरीची वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. हा ट्रक सोडण्यासाठी ट्रक मालकाने कोलते यांच्या बँक खात्यात परस्पर 50,001 रुपये जमा केले. याप्रकरणी कोलते यांनी पुण्यातील (Pune Crime) खडक पोलीस स्टेशन (Khadak Police Station) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) जबरदस्तीने बेकायदा कामासाठी लाच (Bribe) देऊ केल्याची तक्रार केली. यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दत्तात्रय हिरामण पिंगळे (वय-33 (रा. देऊळगांवगाडा. ता. दौंड), अमित नवनाथ कांदे (वय-29 रा. कमलविहार, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी तक्रार केली होती. त्यानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (pune anti corruption bureau) गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. लाचेचा हा प्रकार 13 सप्टेंबर रोजी घडला होता.

तहसीलदार तृप्ती कोलते यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) शेवाळवाडी बस डेपोजवळ बेकायदा वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच 16 टी 4100) दिसला. तृप्ती कोलते यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूस घेण्यास सांगून थांबवला. त्यावेळी ट्रक चालक चावी घेऊन पळून गेला. यानंतर कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला (Venkatesh Chiramulla) यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. तसेच तलाठी किंवा कोतवाल यांना पाठवण्यास सांगितले.

कोलते या ट्रक जवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत बसल्या होत्या.
त्यावेळी दत्तात्रय पिंगळे हा त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपण गाडीचा मालक असल्याचे सांगत गाडी सोडण्याची विनंती केली.
तसेच त्यांना पैशांचे आमिष देऊ लागला.
कोलते यांनी त्याला स्पष्ट नकार देऊन करवाई करणार असल्याचे सांगितले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारस त्यांच्या मोबाइल फोनवर चार मिस कॉल आले.
परंतु त्या बैठकीत असल्याने त्यांनी फोन उचलले नाहीत.

बैठक संपल्यानंतर कोलते यांनी कॉल केला. त्यावेळी अमित कांदेने त्यांचा बँक खात्याचा क्रमांक (Bank account number) मागितला आणि त्या खात्यात पैसे जमा करायचे असल्याचे सांगितले.
कोलते यांनी बँक खाते तपासले असता सुरुवातील एक रुपया आणि त्यानंतर 50 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले.
हे पैसे गुगल पे (Google Pay) द्वारे सायंकाळी जमा केले होते.
पुढील तपास पुणे लाचलुचपत विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक (ACP Seema Adnaik) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Tehsildar of Haveli Trupti Kolte was forcibly given a bribe of Rs 50,000. ACB arrests Dattatraya Pingale in Daund and Amit Kande in Manjari

Related Posts