IMPIMP

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

by nagesh
pune crime | pune police and nagar police arrested two thieves for stealing rs 97 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात घरफोडीच्या (Pune Crime) घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावरच चोरट्यांनी डल्ला (theft) मारल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार 13 जून 2021 ते 15 जुलै 2021 या कालावधीत शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारात घडला (Pune Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस हवालदार दिलीप तुकाराम गायकवाड (वय-56) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 15 जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारातील एका खोलीत जुने हवेली पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात आला आहे. चोरट्यांनी मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी खोलीतून अॅल्युमिनीअम पट्ट्या, तांब्याची तार, गॅस सिलेंडर, अ‍ॅल्युमिनीअम लाद्या असा एकूण 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत (API Nanasaheb Sawant) करीत आहेत.

Web Title :  pune crime | theft in mamledar kacheri near khadak police station

हे देखील वाचा :

Gold Price Today | ‘या’ आठवड्यात सुद्धा स्वस्त झाले सोने, आता 9051 रुपये कमी दरात खरेदी करा 10 ग्रॅम; जाणून घ्या भाव

Earn Money | नोकरी सोडून 2 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, थेट 4 लाखाचा होईल नफा; सरकार देईल आर्थिक मदत

Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Related Posts