IMPIMP

Pune Cyber Crime | सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी ! महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा

by nagesh
Pune Crime | 2 lakh withdrawn from credit card account by sending link to Cpoints app, FIR against person in Delhi for financial fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Cyber Crime | टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर (Facebook) गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे़ सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंजाबावस्ती येथील एका ४८ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेने फेसबुकवर गाद्या विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपण लष्करात नोकरीस असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.(Pune Cyber Crime)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या गाद्यांची खरेदीची रक्कम क्युआर कोडद्वारे पाठवित आहे, असे सांगितले. फिर्यादीस वेळोवेळी वेगवेगळे क्युआर कोड पाठवून त्याद्वारे पेमेंट प्रोसेस करावयास सांगून त्यांच्या खात्यातून ५ लाख ४३ हजार ६१ रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating) केली. गेल्या वर्षी २२ ते २७ डिसेबर २०२० मध्ये झालेल्या या घटनेची फिर्यादी यांनी आता तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Cyber Crime | sell mattresses on social media ! cheating case of woman worth of 5.5 lacs

हे देखील वाचा :

Crime News | धक्कादायक ! आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य

Mumbai CNG-PNG Price | CNG आणि PNG च्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या दर

MP Supriya Sule | ‘मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल’

Related Posts