IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

by Team Deccan Express
Pune Minor Girl Rape Case | Sexual abuse of a minor girl by a sister's friend

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे बहिणीच्या कंपनीतील मित्राने घरात घुसून मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. आरोपी संतोष बाबासाहेब अंबाड Santosh Babasaheb Ambad (वय-27) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) IPC 376(6),45,5,06 सह बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत (Child Sexual Abuse Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत पीडित मुलीने शनिवारी (दि.21) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास फिर्यादी मुलीच्या राहत्या घरात घडली. पोलिसांनी संतोष अंबाड (वय-27 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्या बहिणीच्या कंपनीमध्ये कामाला आहे. मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपी घरात घुसला. त्याने फिर्यादी सोबत जबरदस्ती करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Sexual abuse of a minor girl by a sister’s friend

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts