IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून गोळ्या मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

December 31, 2024

पिंपरी: Pune Pimpri Chinchwad Crime News | मिळकतीच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून गोळ्या मारण्याची धमकी दिली. मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे ५३ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात विनयभंग (Molestation Case) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी येथे शनिवारी (दि.२८) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ५४ वर्षीय महिलेने याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात (Kalewadi Police Station) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला पोलिस कर्मचारी हा फिर्यादी महिलेचा भाऊ आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई-वडिलांच्या मिळकतीवरून वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिस कर्मचारी पत्नी आणि मुलीसह फिर्यादी बहिणीच्या घरी आला.

बहिणीसोबत आईदेखील होती. त्यावेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलीनेही त्यांना शिवीगाळ केली. ‘मीपण पोलिस आहे, मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल’, असे तो म्हणाला. त्यानंतर पत्नी आणि मुलीला तो म्हणाला की, तुम्ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही तर मी फास लावून आत्महत्या करेन. फिर्यादी बहिणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.