IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | चॅप्टर केसमध्ये उभा केला तोतया जामीनदार ! चिंचवड पोलिसांनी केली दोघांना अटक

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | चॅप्टर केसमध्ये एका १९ वर्षाच्या गुन्हेगाराने बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन तोतया जामीनदार (Bogus Jamindar) उभा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार ओंकार बंड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम अशोक मडीवाळ (वय १९, रा. हडपसर) आणि विकास कृष्णा माने (वय २८, रा. माने वस्ती, नांदुरे, पो. जांभुड, ता. पंढरपूर, जि़ सोलापूर) यांना अटक केली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम मडीवाळ याच्यावर चॅप्टर केस सुरु होती. या केसमध्ये त्याने विकास माने याला तोतया जामीनदार बनवले. त्याचे नाव व पत्ता बदलून त्याचे नाव संतोष मारुती तळेकर (वय ३०, रा. राठी कदम वस्ती, निगडी) असे नाव व पत्ता असलेली बनावट कागदपत्रे बनविली. ही बनावट कागदपत्रे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात सादर केली. हा प्रकार लक्षात आल्यावर दोघांना पकडून चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल करंबळकर (API Vithal Karambalkar) तपास करीत आहेत.