IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टून ठेचून ताडी विक्रेत्याचा निर्घृण खून, तळवडे रोडवरील थरार

by sachinsitapure

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका ताडी विक्रेत्याचा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने चाकू, कोयत्याने वार (Koyta Attack) करुन दगडाने ठेचून खून केला आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास तळवडे (Talwade) येथील कॅनबे चौका जवळ असलेल्या तुळजाभवानी स्क्रॅप सेंटर समोरील रोडवर घडली आहे. निलेश उर्फ मुकुंद अशोक भंडारी (वय-36 रा. गुलमोहर हौसिंग सोसायटी, परंडवाल चौका जवळ, देहुगाव ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे (Murder In Talwade).

याबाबत भंडारी यांचे मेहुणे मोनेश यंकप्पा भंडारी (वय-22 रा. देहुगाव मुल रा. कल्लुर ता. सिंदनोर जि. रायचुर, कर्नाटक) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर आयपीसी 302, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निलेश याचे अधिकृत ताडी विक्री करण्याचे दुकान आहे. मेहुना आणि निलेश दोघे दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना अडवून खून केला. हा खून पूर्ववैमनस्यातून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश भंडारी हा अधिकृत ताडी विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. त्याचा ओटास्कीम निगडी आणि देहू येथे अधिकृत ताडी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहुणा फिर्यादी आणि निलेश हे दोघे दुचाकीवरुन देहुगाव येथे दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला.

तुळजाभवानी स्क्रॅप सेंटर समोर दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले. आरोपींनी निलेश याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे निलेश घाबरुन रस्ता क्रॉस करुन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पळला. तेव्हा आरोपींना त्याचा पाठलाग करुन निलेशला गाठले. मेहुण्यासमोरच निलेशचा धारदार चाकू, कोयत्याने वार करुन आणि दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून खून केला. आरोपी हे फरार असून त्यांचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे करीत आहेत.

Related Posts