IMPIMP

Pune Police | पुण्यातील 3 पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

पुणे :  सरकारस्ता ऑनलाइन – Pune Police | वारजे पोलीस ठाण्यातील तपास पथकाचा कार्यालयातून अटक केलेला आरोपी पळून गेल्या प्रकरणी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी वारजे पोलीस ठाण्यातील तिघा कर्मचार्‍यांना निलंबित (Pune Police) केले आहे.

पोलीस हवालदार संभाजी गायकवाड (Police Havaldar Sambhaji Gaikwad), पोलीस नाईक महेश धोत्रे
(Police Naik Mahesh Dhotre) आणि पोलीस शिपाई विशाल कदम (Police Vishal Kadam) अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वारजे येथील एका ४ वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन एका २८ वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली होती.
त्यानंतर त्याला या तिघांच्या देखरेखीखाली तपास पथकात ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर सर्व जण झोपल्यावर आरोपी १८ सप्टेंबर रोजी वारजे पोलीस ठाण्यातून (Warje Police Station) पळून गेला. हा प्रकार सकाळी ६ वाजता पोलिसांच्या लक्षात आला.
त्यानंतर एकच गडबड उडाली होती. बरीच शोधाशोध केल्यानंतर हा आरोपी एका दारूच्या गुत्यावर आढळून आला होता.
मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी त्याची दखल घेऊन तिघांना निलंबित केले आहे. एकाचवेळी 3 पोलीस अंमलदार निलंबित झाल्याने पुणे शहर (Pune Police) पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title : pune police three police of warje malwadi police station are suspended by dcp purnima gaikwad

हे देखील वाचा 

Ajit Pawar | स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच नागरीकांनाही आता मुभा (व्हिडीओ)

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना

Pune Police | आता पुण्यातही महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | सराईत शिकलगरी टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

Related Posts