IMPIMP

Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले तरी न्यायालयात सुनावणी नाही

by nagesh
Rekha Jare Murder Case | aurangabad bench of the bombay mumbai high court today rejected the bail plea of bal alias balasaheb jagannath bothe patil in the murder case of social activist rekha jare nagar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन –  संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला (Rekha Jare Murder Case) आज मंगळवारी (30 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. या हत्या प्रकरणात (Rekha Jare Murder Case) मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्यासह 11 जणांना अटक (Arrest) असून न्यायालयात आरोपपत्र ही दाखल केले आहे. मात्र वर्ष झाले तरी अद्याप त्यावर सुनावणी सुरु झाली नाही. न्यायालयात या खटल्याची सुनावणी नियमित सुरु होण्यापूर्वी 11 आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया होईल. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे (Sagar Bhingardive) व बाळ बोठे (Bal Bothe) यांनी जामिनासाठी (bail Application) जिल्हा न्यायालय (District Court) व औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench) अर्ज केले असून त्यावरील सुनावणी ही प्रलंबित आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नगर-पुणे महामार्गावरील (Nagar-Pune highway) जातेगाव घाटात 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठ वाजता दुचाकीला कट
मारल्याच्या कारणावरून रेखा जरे यांची कार अडवून दोघांनी त्यांच्याशी वाद घातला.
त्याचवेळी त्यांचा गळा धारदार चाकूने चिरून हत्या (Rekha Jare Murder Case) केली.
रस्त्यात झालेल्या वादावादीतून त्यांचा खून झाल्याचे समोर येत होते.
मात्र हा वाद सुरु होता त्यावेळी जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता. त्या आधारे पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

दोन दिवसातच पोलिसांनी ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक),
सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) पाच आरोपींना अटक झाली. त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी 3 डिसेंबरला जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे जाहीर केले.
त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. फरार झालेल्या बोठेचा केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पोलीस शोध घेत होते.
तब्बल 102 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 12 मार्च 2021 ला हैदराबाद येथे अटक झाली. यावेळी पोलिसांनी बोठेला मदत करणाऱ्यांनाही अटक केली.
या हत्याकांडात एकूण 11 आरोपी असून, यात प्रत्यक्ष खुनात सहा व फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारे पाच जण आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

वर्ष झाले तरी या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी सुरु झाली नाही.
डिसेंबरमध्ये आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया होऊन त्यानंतर नियमित सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे.
सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. यादव पाटील (Adv. Yadav Patil) काम पाहत आहेत.
तर फिर्यादी जरे कुटुंबाकडूनही स्वतंत्र वकील अ‍ॅड. सचिन पटेकर (Adv. Sachin Patekar) यांची नियुक्त करण्यात आली आहे.

जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे विरोधात विनयभंग व खंडणीचे (ransom) असे दोन स्वतंत्र गुन्हे (FIR) दाखल झाले आहेत.
ज्यावेळी बोठे फरार होता यावेळी त्याने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता.
दुसरीकडे त्याच्या संपत्तीची चौकशी करावी व अन्य मागण्यांसाठी पोलिसांसह राज्य सरकारला निवेदनेही पाठविण्यात आली होती.
विविध तक्रारींमुळे हे प्रकरण चांगलेच गाजले. जिल्हा न्यायालयाने बोठे याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
येत्या 2 डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणातील आरोपी भिंगारदिवे याच्या जामीनावरही जिल्हा न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Rekha Jare Murder Case | after a year rekha jare murder case pending in ahmednagar court

हे देखील वाचा :

83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर ‘अशी’ कमवली ‘इज्जत’, रणवीर सिंगच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चहाते म्हणाले – ‘सुपर हिट’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला’

Saral Pension Yojana | तुम्ही एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवू शकता पेन्शन, जाणून घ्या ‘या’ विशेष योजनेबाबत सर्वकाही

Related Posts