IMPIMP

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

by nagesh
Sameer Wankhede Spying Case | mumbai police commissioner inquires sameer wankhede spying case and calls report

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईतील क्रूझवर एनसीबीने छापा टाकून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला अटक (Arrest) केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. एनसीबीचे (NCB) मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) साध्या वेशातील पोलिसांकडून हेरगिरी (Sameer Wankhede Spying Case) केल्याप्रकरणी वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale) यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार मी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसांकडून चौकशी (Inquiry) करण्यास सांगून अहवाल (Sameer Wankhede Spying Case) सादर करण्यास सांगितल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मागील आठवड्यात मुंबईच्या समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते.
यावरुन राज्य सरकार (State Government) आणि एनसीबीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
आर्यन खानकडे ड्रग्स सापडले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे टार्गेट शाहरुख असल्याचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.
आता या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली
(Sameer Wankhede Spying Case) जात असल्याची तक्रार केली आहे.
महाराष्ट्राचे पोलीस (Maharashtra Police) महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली.
ओशिवारा पोलिसांनी (Oshiwara police) स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे 2015 मध्ये निधन झाले आहे.
तेव्हा पासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Sameer Wankhede Spying Case | mumbai police commissioner inquires sameer wankhede spying case and calls report

हे देखील वाचा :

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या बचावाची पद्धत

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये आलेल्या 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांनी 12 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Related Posts