IMPIMP

Sangli Crime | कौटुंबिक वादातून सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून; मेहुणा पोलिसांच्या ताब्यात

by Team Deccan Express
Jalna Crime News | 18 year old boy stabs 8 year old brother to death in jalna

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli Crime | पोलिसांच्या रेकॉर्डवरील असणाऱ्या गुन्हेगाराचा कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना सांगलीत (Sangli Crime) घडली आहे. येथील राजीवगांधी झोपडपट्टीमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जावेद नूर महंमद गवंडी (Javed Noor Mohammad Gawandi) (वय 45) याच्या पोटात, मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू (Died) झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, जावेद गवंडी याच्यावर घरफोडी जबरी चोरी यांसह बाराहुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जावेद हा पत्नी आणि एक मुलासह जुना बुधगाव रोडवरील राजीव गांधी झोपडपट्टी मधील पत्र्याच्या घरात राहतो. त्याच्यावर सांगली शहर, संजयनगरसह इतर पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे बाराहुन अधिक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पेंटिंग काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. जावेद याची पत्नी जास्मिन (Jasmine) हिच्याशी त्याचा 2 दिवसांपूर्वी वाद झाला होता. (Sangli Crime)

दरम्यान, गवंडी याचा मेहुणा तौफिक कुरणे (Taufiq Kurne) यानेच त्याच्या त्रासाला कंटाळून
खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार तातडीने तपासाची चक्रे फिरवून
पोलिसांनी तौफिक कुरणे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, ही घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती समजताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे (Sangli City Police Station)
पोलीस निरीक्षक अजय सिंदकर (Police Inspector Ajay Sindkar) यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

Web Title :- Sangli Crime | family dispute murder of sangli criminal one arrest

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts