IMPIMP

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

by Team Deccan Express
Satara Crime | Bad luck ! A 12-year-old schoolboy dies of shock while taking a bath satara crime news

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन  Satara Crime | एका 12 वर्षाच्या शाळकरी मुलाचा बाथरुममध्ये अंघोळ करत असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू (Died) झाल्याची दुर्देवी घटना (Satara Crime) घडली आहे. ही घटना औंध (Aundh) येथील करांडेवाडी नजीकच्या यादव मळ्यात घडली. पियुष सुनिल यादव (Piyush Sunil Yadav) असं त्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, औंध येथील करांडेवाडी रस्त्याला असलेल्या यादव मळ्यात रहात असलेल्या सुनील सावता यादव (Sunil Sawta Yadav) यांचा मुलगा पियुष यादव हा राहत्या घरात सकाळी अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेला होता. बाथरूममधील वायरचा शॉक लागल्याने पियुषला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला कुटुंबियांनी तत्काळ औंध ग्रामीण रुग्णालय (Aundh Rural Hospital) येथे उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Satara Crime)

दरम्यान, याबाबत सुनील यादव यांनी औंध पोलिस ठाण्यात (Aundh Police Station) तक्रार दिली. वरील घटनेची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील (Police Constable Chandrakant Patil) करीत आहेत.

Web Title : Satara Crime | Bad luck ! A 12-year-old schoolboy dies of shock while taking a bath satara crime news

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts