IMPIMP

Satara Crime | खळबळजनक ! पैशासाठी तरूणाने वृद्धेला झोपडीसह पेटवून दिलं; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

by nagesh
Satara Crime | satara youth set ablaze 72 year old woman in maan crime news

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन  – Satara Crime | साता-यातील माण तालुक्यातील एक खळबळजनक घटना (Satara Crime) उघडकीस आली आहे. एका वृद्धेला झोपडीसह पेटवून देत जाळून मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा (Murder in Satara) दाखल करुन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैशासाठी हा प्रकार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे. नाना दिगंबर गलांडे (Nana Digambar Galande) (वय 20, राहणार जाशी) असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सीताबाई जयसिंग गलांडे (Sitabai Jaysingh Galande) (वय 72) असं मृत्यू (Died) झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत माहिती अशी, जाशी येथील सीताबाई गलांडे या पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना पोरंबाळं नसल्याने त्या एकट्याच राहतात. त्यांच्या शेजारी राहणारा नाना गलांडे हा तरुण त्यांना पैशासाठी नेहमी त्रास देत होता. पैशाच्या कारणावरून नाना गलांडेने 5 जानेवारीला रात्री वृद्धेची झोपडी पेटवून दिली. घराशेजारी कोणीच नसल्याने या घटनेचा थांगपत्ताच कोणाला लागला नाही. दोन दिवसानंतर वृद्धेचा भाचा घटना घडल्याच्या ठिकाणी आला असता त्यांना सीताबाई राहत असलेली झोपडी जळाल्याचे आणि त्यात सीताबाई याही जळून मृत झाल्याचे दिसले. (Satara Crime)

दरम्यान, त्यानंतर नातेवाईक उत्तम हरीबा चोरमले (Uttam Hariba Chormale) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर, पैशासाठी नाना गलांडे सीताबाईंना त्रास देत होता, असं फिर्यादीने सांगितलं. त्या तक्रारावरुन आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यावर दहिवडी पोलिसांनी (Dahivadi Police Station) सोमवारी संशयिताला अटक (Arrested) केली आहे.. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी न्यायालयाने (Dahivadi Court) 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. याप्रकरणी अधित तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर (API Santosh Tasgaonkar) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Satara Crime | satara youth set ablaze 72 year old woman in maan crime news

हे देखील वाचा :

Covid Test | कोरोना रूग्णाच्या संपर्कात येणार्‍यांना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत जास्त जोखीम नसेल; केंद्राने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी

EPFO E-Nomination | ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता पाहता येणार नाही तुमच्या PF खात्याचा बॅलन्स

Maharashtra Police Corona | राज्य पोलीस दलाला कोरोनाचा ‘विळखा’ ! एकाच दिवसात 298 पोलीस बाधित, 2 डोस घेतल्यानंतरही 1625 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना लागण

Related Posts