IMPIMP

Solapur Crime | दुर्दैवी ! शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू

by nagesh
Solapur Crime | 3 children die after falling in a field incidents in shetfal of solapur district

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील शेटफळ (Shetfal) येथे एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू (Died) झाल्याची दुर्दैवी घटना (Solapur Crime) घडली आहे. शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कार्तिकेश हिंगमीरे (Karthikesh Hingmire), सिद्धार्थ निकम (Siddharth Nikam), विनायक निकम (Vinayak Nikam) अशी मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील निकम कुटुंब (Nikam Family) हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याच्या शेतात सालाने कामाला आहेत. तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब (Hingmire Family) आहे, सोमवारी डोंगरे यांच्या शेतात डाळिंब तोडणीचे काम सुरू होते. त्यावेळी तिन्ही बालके शेततळ्याच्या शेजारी खेळत होती, ते बराच वेळ दिसली नाहीत, त्यांचा शोध घेतला असता शेततळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. (Solapur Crime)

दरम्यान, तिन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू (Died) झाला. ही घटना 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात (Mohol Rural Hospital) या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : Solapur Crime | 3 children die after falling in a field incidents in shetfal of solapur district

हे देखील वाचा :

Pune Crime | 3 लाखांची खंडणी घेणार्‍या RTI कार्यकर्ता सुधीर आल्हाटसह 5 जणांवर आणखी एक गुन्हा

Maharashtra Corona | राज्यात जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Related Posts