IMPIMP

Solapur Crime | बार्शीत 21 वर्षीय युवकाने झोपलेल्या आईची डोक्यात दगड घालून केली हत्या

by nagesh
Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | बार्शी (Barshi) शहरात एका २१ वर्षीय तरुणाने जन्मदात्या आईची झोपलेल्या जागीच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या (Murder) केल्याचे उघडकीस (Solapur Crime) आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आईला गादीवरून ओढत नेत, घराजवळील एका झुडपात मृतदेह टाकला. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाला मुंबईला फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या मार्गावर आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय-४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीराम नागनाथ फावडे असं गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. बार्शी शहरातली वाणी प्लॉट परिसरातील शिंदे यांच्या घरी रुक्मिणी आणि श्रीराम वास्तव्यास होते. कौटुंबीक वादामुळे लहान मुलगा आणि पती हे बार्शी शहरात डंबरे गल्ली येथे राहत होते. रुक्मिणी आणि श्रीराम यांच्यात पैशावरून नेहमी वाद व्हायचा. या वादातूनच त्याने आईची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. श्रीरामाने यापूर्वीही आईला आणि लहान भावाला मारहाण केली होती. या खून प्रकरणी (Solapur Crime) मृत महिलेचे पती आणि लहान भावाकडे चौकशी केली असता, श्रीराम मुंबईला गेला असल्याचे समोर आले. मुंबईला जात असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आरोपीनं ठेवलं होत. हत्या केल्यानंतर घरातील सर्व कपडे घेऊन आरोपी मुंबईला पळाला. त्यानंतर तीन दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला.

Web Title : Solapur Crime | son killed mother in barshi of solapur district

हे देखील वाचा :

Corporator Archana Patil | रुग्णालयांकडून दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास उदासीनता, नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली ‘ही’ मागणी

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये आलेल्या 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या बचावाची पद्धत

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हाकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Related Posts