IMPIMP

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station - Broke a betel nut with a girl from the village by having physical relationship with the young woman.

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने तरुणीने सोलापूर शहरातील कंबर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली असून, याप्रकरणी पुण्यात राहणाऱ्या तरुणावर सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा (Solapur Crime) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पुण्यातील स्वप्नील बंडे या तरुणाविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत आरती ही तरुणी काही दिवसांपूर्वी पुण्यात राहण्यासाठी आली होती. या ठिकाणी तिची आणि आरोपी बंडे याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यातून शारीरिक संबंध आल्याने आरती पाच महिन्यांची गर्भवती राहिली. (Solapur Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरतीने स्वप्नील याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला.
त्यामुळे आरतीने 29 ऑक्टोबर रोजी सोलापुरातील कंबर तलावात उडी मारून आत्महत्या केली.
मुलीच्या आत्महत्येला आरोपी स्वप्नील बंडे हाच जबाबदार असल्याची तक्रार पीडितेच्या आईने दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्नील बंडेवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.

Web Title :- Solapur Crime | suicide of a young woman due to refusal of marriage a crime against the youth of pune

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या गावगुंडांना खाकी वर्दीचा दणका

Gujarat Election 2022 | नवसारी येथे भाजप उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला

Navneet Ravi Rana | हनुमान चालिसा वादाप्रकरणी राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने जारी केले वॉरंट

Related Posts