IMPIMP

Wardha Police | गुंडांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच केला गोळीबार, परिसरात एकच खळबळ

by nagesh
Pune Crime | Robbed of cash, including gold jewelry, at gunpoint; Sensational incident in indapur of Pune district

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाइन –  Wardha Police | हिंगणघाट शहरात (Hinganghat) गोळीबाराच्या (firing) घटनांनी खळबळ माजली आहे. गुरुवारी रात्री गुंडांनी पोलिसांवर गोळीबार (Wardha Police) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट पोलिसांवरच (Wardha Police) गोळीबार होत असल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुंडांनी केलेल्या गोळीबारात सुदैवाने पोलीस थोडक्यात बचावले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलिसांनी गुंडाचा शोध मोहीम सुरु असताना गुरुवारी (दि.12) रात्री साडे नऊच्या सुमारास हिंगणघाट
पासून चार किलोमीटर अंतरावरील येनोरा (Yenora) या गावात दोन अज्ञात तरुण संशयास्पद स्थितीत
फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस, या गुंडांच्या शोधार्थ येणोरा गावात आले. पोलिस
दिसतात या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने नेम चुकल्याने यात कोणीही जखमी झाले नाहीत. गुंडांनी दुचाकी तेथेच सोडून रस्त्याकडेला शेत शिवारात पळून गेले.

दरम्यान, पोलिसांवर गोळीबार करुन दोन्ही गुंड फरार होण्यात यशस्वी झाले होते. परंतु पोलिसांच्या पाठलागानंतर शुक्रवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास एकाला अटक (Arrest) केली. तर दुसऱ्या अल्पवयीन आरोपीस शहरातील रेल्वेलाइन (Railway line) परिसरातून ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही आरोपी मुळचे बिहारमधील आहेत. सुदैवाने या दोन्ही गोळीबाराचे घटनेत पोलिसांसह कुणीही जखमी झाले नाही.

Web Title : Wardha Police | firing on hinganghat police near yenora

हे देखील वाचा :

Partner Choice | पैसा-सौंदर्य नव्हे, पुरुषांमध्ये ‘ही’ गुणवत्ता सर्वात महत्वाची मानतात महिला, जाणून घ्या कोणती

Prepaid Smart Meter | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Related Posts