Warje Malwadi Pune Crime News | मौजमजेसाठी चोरी करणार्या अल्पवयीन मुलाकडून 5 मोटारसायकली, 2 रिक्षा हस्तगत; वारजे पोलिसांची कामगिरी, 7 गुन्हे उघडकीस

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | मोपेडसह थांबलेल्या एका अल्पवयीन मुलाला संशयावरुन ताब्यात घेतल्यावर त्याने या मोपेडसह ५ दुचाकी, २ रिक्षा मौजमजेसाठी चोरल्याचे उघडकीस आले आहे. (Arrest In Theft Case)
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व पोलीस अंमलदार हे २४ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते. बारटक्के हॉस्पिटलजवळ एका ग्रे व मोती रंगाची होंडा डिओ मोपेड सह एक संशयित मुलगा थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे मोपेडच्या कागदपत्रांची विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील दुचाकी ही कर्वेनगर भागातून चोरीला गेल्याचे दिसून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आणखी वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या एकूण ५ मोटारसायकल व २ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील ४, राजगड, भोसरी, येरवडा येथील प्रत्येकी एक अशा ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार शरद पोळ, योगेश वाघ, सागर कुंभार, अमित शेलार, प्रशांत चव्हाण, मनोज पवार, गणेश कर्चे यांनी केली आहे.
Comments are closed.