Yavatmal Crime News | घरफोडीच्या आरोपीकडून सोन्याचे दागिने जप्त; यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई

घाटंजी (यवतमाळ) : Yavatmal Crime News | शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांगरनगर येथील तक्रारदार सुजर बैस (३९) हे २७ डिसेंबर २०२४ रोजी वडीलाची प्रकृती बरी नसल्याने ते सहकुटुंब पिंपरी बुटी या गावी गेले होते. बैस कुटूंबीय ३० डिसेंबर २०२४ रोजी यवतमाळ येथे परत आले. घरी परतल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील अलमारीतील सामान फेक फाक करुन होते. तर अलमारीतील पत्नीची ३० ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र चोरी गेल्याचे लक्षात आले. सदर प्रकरणी यवतमाळ शहर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केरुन प्रकरण तपासात घेतला. ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरीता वेळो वेळी सखोल असे मार्गदर्शन केल्याने शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकट पथकाने घरफोडीतील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे कडून २९.६०० ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र जप्त करण्यात आले. (Arrest In Theft Case)
वरील गुन्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, परिविक्षाधिन पोलीस उप अधीक्षक रोहीत ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम, पोहे रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, पोलीस नायक मिलींद दरेकर, पोलीस शिपाई प्रदीप कुराडकर, गौरव ठाकरे, अभिषेक वानखडे, अश्वीन पवार आदींनी घरफोडीची घटना उघडकीस आनली.
Comments are closed.