IMPIMP

‘या’ कारणामुळं अभिनेता सुशांत सिंहचं ट्विटर अकाऊंट झालं ब्लॉक

by sikandar141
actor sushant singh twitter account block he thanks pm bjp and rss

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सुशांत सिंह (sushant singh) हा टीव्ही वरील प्रसिद्ध चेहरा आहे. याचबरोबर तो अनेक सामाजिक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले निर्भीड मत व्यक्त करत असतो. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपले ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाले असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने ट्विटर ब्लॉक झालेल्याचा स्क्रीन शॉट शेअर केला. त्यावर ‘सुशांत आपले अकाऊंट स्थगित केले आहे. कायदेशीर मागणीनुसार तुमचे भारतातील अकाऊंट स्थगित करण्यात आले आहे.’ असा संदेश लिहिला होता. अभिनेता सुशांत सिंह यांनी बुधवारी ट्विटर आणि भारत सरकारचा अशा प्रकारे अनोखा निषेध नोंदवला.

18000 ची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत

फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिस देतंय पैसे दुप्पट करण्याची सुवर्णसंधी, आजच करा 1000 रूपयांची गुंतवणूक अन् मिळवा लाखोंचा लाभ

सुशांत सिंह (sushant singh)आणि इतरांची अकाऊंट ट्विटरने पहिल्यांदाच ब्लॉक केलेली नाहीत. यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान, सुशांतने पत्रकार आणि न्यूज पोर्टल विरुद्ध शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर विरुद्ध आवाज उठवला होता. यावेळीही सुशांतसह अनेकांची अकाऊंट ब्लॉक करण्यात आली होती. त्याचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर त्याने ट्विटरला ‘अकाऊंट ब्लॉक करण्यापूर्वी एखादी नोटिस तरी द्यायची सभ्यता असावी.’ असा टोमणा मारला. याचबरोबर त्याने आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला टॅग करत त्यांचे उपरोधिक आभार मानले. याचबरोबर ‘तुम्ही मला योग्य मार्गावर आहे हे दाखवून दिल्याबद्दल आभार.’ असेही तो म्हणाला.

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

दरम्यान, सुशांतचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरला सवाल केला. तिने ‘सुशांत आणि इतरांचे ट्विटर अकाऊंट का ब्लॉक केले?’ असा सवाल ट्विटर इंडियाला केला. तर अभिनेता गुलशन यांनी ‘पुन्हा एकदा अरे बापरे पण, कशासाठी? अशी प्रतिक्रिया दिली.

Also Read :

Vinayak Raut : ‘नारायण राणेंना कावीळ झालीय, पनवती म्हणून भाजपने त्यांना अडगळीत टाकलंय’

कौतुक करावं तेवढं कमी ! मिताली राज वर्षभरापासून करतेय रिक्षा चालकांना भरघोस मदत

ओपन रिलेशनशिपमध्ये हॉलीवुडचे ‘हे’ 3 स्टार्स? KISS करतानाचे फोटोज Viral

अटक न करण्यासाठी परमबीर सिंह यांनी 10 कोटीची केली होती मागणी, सट्टेबाज सोनू जालाननं नोंदवला जबाब

Stress Reduce Foods : कोरोना काळात तणावावर औषधाने नव्हे, डाएटने करा उपचार

Related Posts