IMPIMP

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

by bali123
alka yagnik why left from bollywood

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – अलका याग्निक ( Alka Yagnik ) यांनी 90 दशकात आपल्या आवाजानं सर्वांना पागल करून सोडलं होतं. एक दशक त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. ऐ मेरे हमसफर, एक दोन ती, टीप टीप बरसा पानी अशी अनेक हिट गाणी त्यांनी गायली. परंतु त्या बॉलिवूडमधून अचानक गायब झाल्या. आज त्या आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण त्यांच्या करिअरविषयी जाणून घेणार आहोत.

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

राज कपूर देखील त्यांचा सुरेल आवाज ऐकून प्रभावित झाले
20 मार्च 1966 रोजी अलका यांचा जन्म कोलकात्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. त्यांची आई शास्त्रीय गायिका होती. सर्वात आधी त्यांनी आईकडूनच गाण्याचे धडे घेतले. कोलकात्यामधील एका रेडिओ वाहिनीसाठी त्यांनी गाणी गायलं आणि करिअरला सुरुवात केली. तेव्हा त्या अवघ्या 10 वर्षांच्या होत्या. जेव्हा त्या 14 वर्षांच्या होत्या तेव्हा आई सोबत मुंबईत आल्या. त्यांची राज कपूर यांच्याशी भेट झाली. राज कपूर देखील त्यांचा सुरेल आवाज ऐकून प्रभावित झाले. राज कपूर यांनी अलका यांना पायल की झन्कार या सिनेमात थिरकत अंगल लचक झुकी हे गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर त्यांनी लावारिस सिनेमातील मेरे अंगने में हे गाणं गायलं. त्याकाळी अनेक संगीतकारांना त्यांचा आवाज आवडत होता. परंतु त्यांना अपेक्षित संधी काही मिळत नव्हती. त्यामुळं त्यांनी मुंबई सोडून कोलकात्याला जाण्याचा निर्णय घेतला.

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

तेजाबमध्ये एक दोन तीन गाणं गायलं आणि अलका याग्निक रातोरात स्टार झाल्या
नंतर त्यांना तेजाब सिनेमात एक दोन तीन गाणं गाण्याची संधी मिळाली. माधुरी दीक्षितचा डान्स आणि याला याग्निक यांचा आवाज यामुळं हे गाणं सुपरडुपर हिट झालं. या गाण्यानं अलका याग्निक रातोरात स्टार झाल्या. नंतर बॉलिवूडमधील अनेक सिनेमांसाठी त्यांनी गाणं गायलं.

… म्हणून त्यांनी बॉलिवूडमधून दूर राहण्याचा निर्णय घेतला
एक दशक चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत. याचं कारण असं की, आता रिमेक गाण्यांचा जमाना आला आहे. गाण्यांमध्ये अश्लील शब्द वापरले जातात. रॅपिंगच्या नावाखाली ऑटोट्युन केलं जातं. अशा प्रकराची गाणी त्यांना गाता येत नाहीत. ज्या गाण्यांचा अर्थ आपण चारचौघात सांगू शकत नाही अशा प्रकारची गाणी कशी गायची असा प्रश्न पडतो. त्यामुळं त्यांनी बॉलिवूडमधून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सध्या ते लहान मोठे शो करत असतात.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

Related Posts