IMPIMP

Video : सपना चौधरीच्या गाण्यावरील ‘या’ अभिनेत्रीचा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

by sikandershaikh
pranjal-Dahiya

सरकारसत्ता ऑनलाइन टीम :- डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या सपना चौधरीच्या गाण्यावर अभिनेत्री प्रांजल दहियाचा (pranjal dahiya) डान्स आता व्हायरल होत आहे. हे हरियाणवी गाणे ’बुरखा 3’ मधील आहे. सपना चौधरीच्या या गाण्यावर प्रांजल दहियाने स्टेज प्रोग्राममध्ये धमाकेदार नृत्य केले आहे. तिचे नृत्य अनेकांना खूप आवडले आहे.

या डान्स Video ला 32 लाखाहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. प्रांजल दहियानेही हरियाणवी गाण्यांमध्ये आपली कामगिरी दाखविली आहे. त्यांची गाणी चांगलीच गाजली आहेत. ’52 गज का दमन ’या हरियाणवी गाण्यातील तिच्या नृत्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या गाण्याला 4 महिन्यांत जवळजवळ 55 कोटी व्ह्यू मिळाले आहेत.

टिकटॉक स्टार असलेली प्रांजल दहिया (pranjal dahiya) हिची तुलना आता सपना चौधरीशी केली जात आहे. प्रांजल ही सपनाशी लूक तसेच डान्समध्येही खूप चांगली दिसत आहे. तसेच तिचे फॅन फॉलोइंगही वेगाने वाढत आहे. त्यांचे चाहते प्रांजल दहियाच्या गाण्यांची प्रतीक्षा करीत आहेत.

प्रांजल दहिया हि 19 वर्षांची असून तिने हरयाणवी संगीत उद्योगात पाऊल ठेवले आहे.
या व्हायरल Video च्या गाण्याला विश्वजित चौधरींनी आवाज दिला आहे.
नवीन विशु बबने यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

Related Posts