IMPIMP

कंगनाच्या सुरक्षेवर नेमका खर्च किती येतो ? HM अमित शाह यांच्या गृहमंत्रालयानं दिलं ‘अजब’ उत्तर

by sikandershaikh
kangana-ranaut-securit

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून बॉलिवूड ॲक्ट्रेस कंगना रणौत (kangana ranaut) हिनं ठाकरे सरकारवर टीका केली होती. यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात टीकेचं वॉर पहायला मिळांलं. शिवसेनेनंही इशारा दिला होता की, कंगनानं मुंबईत येऊन दाखवावं. यानतंर कंगनानंही थेट पवित्रा घेत मी येत आहे मुंबईत अडवून दाखवा असं आवाहन दिलं. यानंतर कंगनाला असलेला धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली होती.

जेव्हा कंगना (kangana ranaut) मुंबईत दाखल झाली तेव्हा विमानतळावर मोठ्या संख्येनं शिवसैनिक होते. कंगना आली तेव्हा तिला वाय दर्जाची सुरक्षा होती. मुंबई पोलिसांनीही तिला सुरक्षा पुरवली होती. यानंतर कंगना सुरक्षित घरी पोहोचली होती.

एका व्यक्तीनं कंगनाच्या सुरक्षेसाठी किती खर्च येतो असा प्रश्न माहिती अधिकारातून केंद्रीय गृहमंत्रालयाला विचारला आहे. कंगना रणौत आणि इतर कोणत्याही व्यक्तीला देण्यात येणाऱ्या सुरक्षेवर नेमका किती खर्च येतो याचा हिशोब सांगणं अवघड आहे असं उत्तर गृह मंत्रालयानं दिलं आहे.

कंगनाच्या सुरक्षेवर होणारा खर्च जाणून घेण्यासाठी जम्मू काश्मीरचे रहिवाशी रोहित चौधरींनी माहिती
अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला होता. गृहमंत्रालयानं याला उत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रालयानं सांगितलं की, कंगना आणि इतर व्यक्तींना देण्यात
येणाऱ्या सुरक्षेवर एकूण किती खर्च येतो याची नोंद आमच्याकडे ठेवली जात नाही

गृह मंत्रालयानं असंही सांगितलं की, सुरक्षारक्षकांचे पगार, भत्ते, याची नोंद विविध व्यक्तींकडून ठेवली जाते.
या व्यक्ती विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये कार्यरत असतात.
त्यामुळं सुरक्षेवर होणार नेमका खर्च मोजणं अवघड आहे.

7 सप्टेंबर पासून कंगनाला (kangana ranaut) वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
तिच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 11-12 जवान 24 तास तैनात असतात.

Taj Mahal History : खर्‍या प्रेमाचं प्रतीक ‘ताजमहाल’, जाणून घ्या इतिहास आणि वास्तुकला

Related Posts