IMPIMP

कंगना रणौतनं केलं ट्विट, म्हणाली – ‘सन 2024 मध्ये नरेंद्र मोदीच असणार पंतप्रधान’

by amol
kangana said in 2024 modi will rejoin as pm

सरकारसत्ता ऑनलाइन : बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रणौत Kangana Ranaut नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. या वक्तव्याबरोबरच कंगना नेहमीच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करत असते. यानंतर कंगनाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

यामध्येच आता कंगनाच्या Kangana Ranaut एका ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. भारत जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे सुचविणार्‍या अहवालाच्या आधारे तिने हे ट्विट केले आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये “सस्पेंड होण्याच्या किमतीवर मी जाहीरपणे सांगते की, २०२४ ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील” असे म्हटले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर ते २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावरून कंगनाने २०२४ मध्येही नरेंद्र मोदी निवडणूक जिंकत पंतप्रधान असतील, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

कंगना Kangana Ranaut  लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपटदेखील लवकरच रिलीज होणार आहे.

Assembly Election 2021 : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला ‘राम राम’

भारत पाकिस्तानला देणार ‘कोरोना’ लशीचे डोस; कंगना रणौत म्हणाली- ‘आता तिथंही भाजपचं सरकार’

चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प’

सचिन वाझे यांची फक्त बदली नको, तर अटक करा; प्रवीण दरेकरांची मागणी

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Related Posts