IMPIMP

Ketaki Chitale | केतकी चितळेला ‘त्या’ प्रकरणात ठाणे कोर्टाचा धक्का, न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Ketaki Chitale | thane cour dismisses ketaki chitales pre arrrest plea

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि विवाद हे समीकरण आता नवं नाही. अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी चर्चेत राहते. तर अनेकवेळा तिच्या सोशल मीडिया पोस्टही (Social media post) विवादीत ठरतात. एपिलिप्सी क्वीन (Epilepsy queen) म्हणून प्रसिद्ध असलेली केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एका चर्चेत आली आहे. यावेळी ती केवळ वादग्रस्त विधानांत (controversial statement) अडकली नाही तर तिच्यावर गुन्हा (FIR) देखील नोंदवण्यात आला आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात हे प्रकरण सुरु झाले. जेव्हा केतकीने एका वादग्रस्त पोस्ट केली होती.
तर यासंदर्भात आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला (Pre-arrest bail Rejected) आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट करत असते.
अनेकवेळा तिच्यावर टीकाही केली जाते. परंतु ती याकडे लक्ष देत नाही.
परंतु केतकीने 1 मार्च 2020 रोजी एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
या पोस्टमुळे तिच्यावर टीका तर झालीच शिवाय गुन्हा ही दाखल झाला.

केतकीने वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे 3 मार्च 2020 रोजी वकील स्वप्नील जगताप (Lawyer Swapnil Jagtap) यांनी नवी मुंबई (Navi Mumbai) येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे
व सुरज शिंदे (Suraj Shinde) विरुद्ध जाती व जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याअंतर्गत
(Caste and Tribe Atrocities Prevention Act) गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
परंतु कोर्टाने आता तिचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला आहे.
ठाणे कोर्टाने (Thane Court) केतकीला हा मोठ्ठा धक्का दिला आहेत.
त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : Ketaki Chitale | thane cour dismisses ketaki chitales pre arrrest plea

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :-

Pune Corporation Recruitment | इंजिनिअर्सची पुणे महापालिकेत होणार भरती; जाणून घ्या

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अ‍ॅड.. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

Related Posts