IMPIMP

पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट

by bali123
milind soman tests positive for coronavirus in quarantine

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन ( Milind Soman ) आणि त्याची पत्नी मॉडेल अंकिता कोंवर ( Ankita Konwar ) लग्न झाल्यानंतर सतत चर्चेत येताना दिसत आहेत. आपल्या फोटोंमुळं ते कायमच लक्ष वेधत असतात. अशात आता मिलिंद सोमन याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. खुद्द मिलिंदनंच याबाबत माहिती दिली आहे.

मिलिंदनं ट्विट करत लिहिलं की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी सध्या क्वारंटाईन आहे असंही तो म्हणाला आहे.

अलीकडचे त्यानं आपल्या पत्नीसोबत लिपलॉक किस करतानाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर आता त्याला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्याची पत्नी अंकिता हिनंही कोरोना टेस्ट केल्याचं समजत आहे.

अनेक बॉलिवूड सेलेब्सला कोरोना
बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) याला कोरोना (COVID-19) ची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अद्याप सतीश कौशिक, आर माधवन, कार्तिक आर्यन, रणबीर कपूरसह अनेक सेलेब्सला कोरोनाची लागण झाली आहे. आता यात मिलिंद सोमनचंही नाव समाविष्ट झालं आहे.

मिलिंदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या फोर मोर शॉट्स प्लिज या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये तो झळकला होता. याच्या पहिल्या सीजनमध्ये ही त्यानं काम केलं आहे. अलीकडेच तो पौरषपुर या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसला आहे. मिलिंदनं करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts