IMPIMP

Sonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा जास्तच्या टॅक्स चोरीत सहभाग – प्राप्तीकर विभाग

by nagesh
Sonu Sood Tax Evasion | sonu sood income tax survey income tax

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Sonu Sood Tax Evasion | बॉलीवुड अभिनेता सोनू सूद (Bollywood actor Sonu Sood) च्या घरावर काल इन्कम टॅक्सचा सर्वे संपला. यानंतर आज एक मोठी बातमी समोर आली आहे. एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टनुसार, अभिनेता सोनू सूद 20 कोटीपेक्षा जास्तच्या टॅक्स चोरीत सहभागी आहे (Sonu Sood is involved in tax evasion worth over Rs 20 crore).

प्राप्तीकर विभागाने आज एका वक्तव्यात म्हटले की, तपासणीसाठी लागोपाठ तीन दिवस मुंबईतील घराचा दौरा केल्यानंतर आढळून आले की, अभिनेता 20 कोटीपेक्षा जास्तच्या टॅक्स चोरीत सहभागी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

छापेमारी राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप
तत्पूर्वी 48 वर्षीय सोनू सूदने अलिकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी सरकार (Aam Aadmi government) सोबत सहभागी होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली. यामुळे ही छापेमारी राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, प्राप्तीकर विभागाने म्हटले की, सोनू सूदच्या फाऊंडेशनने परदेशी दानशूरांकडूना कायदेशीर-परदेशी योगदान कायद्याचे उल्लंघन करत एक क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून 2.1 कोटी सुद्धा जमवले आहेत, जो प्लॅटफॉर्म अशाप्रकारचे व्यवहार नियंत्रित करतो.

कर चोरीचे पुरावे मिळाले (Evidence of tax evasion found)
यासोबतच विभागाचे म्हणणे आहे की, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकार्‍यांच्या परिसरात तपासादरम्यान,
कर चोरीसंबंधी आक्षेपार्ह पुरावे मिळाले आहेत.
अभिनेत्याने अवलंबलेली मुख्य कार्यप्रणाली ही अनेक लोकांशी बनावट असुरक्षित
कर्जाच्या रूपात आपल्या बेहिशोबी उत्पन्नाला रूट केल्याची आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

फाऊंडेशनमध्ये आले 18 कोटी रूपये

अभिनेत्याविरूद्ध करण्यात आलेल्या आरोपानुसार, कोविड-19 प्रभावित लोकांना मदत केल्याने त्याचे मोठे कौतूक झाले.
परंतु सोनू सूद चॅरिटी फाऊंडेशन (Sonu Sood Charity Foundation) ने मागील वर्षी जुलैमध्ये कोविडच्या पहिल्या लाटेत 18 कोटीपेक्षा जास्त दान जमवले होते.
या वर्षी एप्रिलपर्यंत, त्यापैकी 1.9 कोटी मदतकार्यात खर्च केले आहेत आणि उर्वरित 17 कोटी संस्थेच्या खात्यात विनावापर पडून आहेत.

Web Title :- Sonu Sood Tax Evasion | sonu sood income tax survey income tax

हे देखील वाचा :

Pune News | मुस्लिम बांधवांच्या वतीने मानाच्या गणपतींच्या महाआरतीचे आयोजन; कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले – ‘पुण्यातील गणेशोत्सव हा सामाजिक सलोख्याचा आदर्श’

Satara Crime | पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला थेट ‘CEO’ च्या दालनात ‘राडा’

Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

Related Posts