IMPIMP

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

by bali123
tv actress ankita lokhande speaks about casting couch experience in film industry

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. अनेकदा तिनं बोल्ड अवतारही दाखवला आहे. सोशलवरही ती कायमच सक्रिय असते. पुन्हा एकदा अंकिता चर्चेत आली आहे. परंतु यावेळी तिनं कास्टींग काऊचबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा तिला पहिला ब्रेक मिळाला नव्हता. त्यावेळी अंकिताला अनेक वेगवेगळे अनुभव आले. याबद्दल तिनं आता एक खुलासा केला आहे.

अंकिता Ankita Lokhande म्हणाली, मी खूप लहान होते तेव्हा एका साऊथच्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी मला बोलवण्यात आलं होतं. तिथं एका माणसानं मला खोलीत बोलवलं. त्याला काही विचारायचं आहे असं मला सांगितलं. मी गेल्यानंतर तो म्हणाला, तुला कॉम्प्रोमाईज करावं लागेल. तयारी आहे ना असा प्रश्न त्यांनी मला केला.

https://www.instagram.com/p/CLYcN82Lwrd/

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

पुढं बोलताना अंकिता म्हणाली, मी तेव्हा साधारण 19-20 वर्षांची होते. त्याने मला ज्या खोलीत बोलवलं तिथं कोणीच नव्हतं. तेव्हा मीही मुद्दाम विचारलं, कोणतं कॉम्प्रोमाईज करावं लागेल ? मला डिनर पार्टीला जावं लागेल ? पोड्युसर्सला काय वाटतं ? असं मी त्यांना विचारलं.

अंकितानं असंही सांगितलं की, मी लहान होते तरी त्यांची चांगलीच शाळा घेतली. तुम्हाला चांगली हुशार अभिनेत्री नको आहे तर झोपण्यासाठी मुलगी पाहिजे ? असा सवाल मी केल्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि आम्ही तुला काम द्यायला तयार आहोत असं ते म्हणाले. परंतु मी त्यांना स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही तर फिल्म इंडस्ट्रीतील एका नावाजलेल्या अभिनेत्यानंही गैरवर्तन केल्याचा गौप्यस्फोट अंकितानं यावेळी बोलताना केला. तिला कोणाचंही नाव घ्यायचं नाही असंही तिनं यावेळी सांगितलं.

राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच; गेल्या 24 तासांत 28,699 नवे रुग्ण, 132 कोरोनाबाधितांचा मृत्यू

अंकिताच्या Ankita Lokhande वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता ही तिची मालिका खूप गाजली. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेव्यतिरीक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Related Posts