IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ महिन्यात मिळेल आणखी एक खुशखबर!

by nagesh
Business Idea | business idea start a solar panel with low investment earn lakh of rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक खुशखबर मिळणार आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) 17 टक्केने वाढून 28 टक्के झाला आहे. सोबतच हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा 24 टक्क्यावरून वाढून 27 टक्के केला आहे. या दरम्यान आणखी एक गुड न्यूज येणार आहे. जुलै 2021 साठी महागाई भत्त्याची घोषणा होणार आहे. यामध्ये 3 टक्केची आणखी (7th Pay Commission) वाढ होऊ शकते.

मिळालेल्या वृत्तानुसार, महागाई भत्त्याची घोषणा याच महिन्यात होऊ शकते.
मात्र, याची कोणतीही डेडलाईन ठरलेली नाही.
वृत्तानुसार, सरकार सप्टेंबरमध्ये घोषणा करून त्याचे पेमेंट ऑक्टोबरच्या सॅलरीत करू शकते.

कर्मचारी यूनियनचे म्हणणे आहे की, सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्याची घोषणा झाली तर सरकारने जुलैपासून आतापर्यंतचा एरियरसुद्धा दिला पाहिजे.
कारण, अगोदरच दिड वर्षाच्या एरियरवर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने नाराजी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

3 टक्के आणखी वाढणार महागाई भत्ता

कर्मचारी यूनियनने सुद्धा मागणी केली आहे की, सरकारने लवकरात लवकर 3 टक्के महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करावी.
जेणेकरून कर्मचार्‍यांना महागाईतून थोडा दिलासा मिळेल.
AICPI इंडेक्सचे आकडे आले आहेत.

इंडेक्स 121.7 वर पोहचला आहे. अशावेळी जून 2021 साठी डीएमध्ये 3 टक्केची वाढ होणार आहे.
जून 2021 च्या इंडेक्समध्ये 1.1 अंकाची वाढ झाली आहे, ज्यामुळे तो 121.7 वर पोहचला आहे.

अशाप्रकारे एकुण डीए 31.18 टक्के होतो. परंतु, डीएचे पेमेंट राऊंड फिगरमध्ये होते.
अशावेळी DA 31 टक्केच मिळेल. आता पुन्हा 3 टक्केच्या वाढीनंतर महागाई भत्ता 31 टक्केच्या पुढे जाईल.

म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत पुन्हा एकदा चांगली वाढ होईल.
CM सेक्रेटरी (स्टाफ साईड) शिव गोपाल मिश्रा यांचे म्हणणे आहे की,
लवकरच सरकारने याची घोषणा केली तर निश्चितच सरकारी कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळेल.

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission central employees are going get new gift soon salary will increase so much one stroke

हे देखील वाचा :

Mukesh Ambani | सप्टेंबरमध्ये 37 हजार कोटीचे मालक बनले मुकेश अंबानी, जाणून घ्या याचे कारण

Beed News | वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नितीन चितळेंना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दीतील 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय; नगरविकास मंत्र्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश

Related Posts