IMPIMP

7th Pay Commission | कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी होईल 26000 रुपये ! फिटमेंट फॅक्टरबाबत नवीन अपडेट, 2 दिवसात येऊ शकतो निर्णय

by nagesh
Assembly Elections 2022-2023 | elections in 11 states in 2022 23 modis mission to win elections

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government Employees) दिर्घकाळापासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी (Fitment Factor Hike) करत आहेत. त्यांना दोन दिवसात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टरवर बुधवारी होणार्‍या कॅबिनेट बैठकीत चर्चा होऊ शकते. जर मोदी सरकारने (Modi Government) यास हिरवा झेंडा दाखवला तर 18000 रूपये बेसिक सॅलरी (Basic Salary) घेणार्‍या कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी 26,000 रूपये होईल. चांगली वाढ होऊ शकते. (7th Pay Commission)

कॅबिनेट बैठकीत वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर

सध्या कर्मचार्‍यांना 2.57 टक्केच्या आधारावर फिटमेंट फॅक्टर अंतर्गत वेतन मिळत आहे, जे वाढवून 3.68 टक्के केले गेले, तर कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात 8000 रूपये वाढतील. याचा अर्थ असा की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन 18000 रूपयांवरून वाढून 26,000 रूपये होईल.

कर्मचार्‍यांचा इतका वाढेल पगार

जर फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 टक्के केला तर कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 26,000 रूपये होईल. आता जर तुमचे मूळ वेतन 18000 रूपये आहे, तर भत्ते वगळून तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18000 x 2.57 = 46,260) मिळतील. जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर सॅलरी 95,680 रूपये (26000 x 3.68 = 95,680) होईल. (7th Pay Commission)

यापूर्वी इतकी होती बेसिक सॅलरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मंजूरी दिली होती.
एंट्री लेव्हल बेसिक पे 7000 रुपये प्रति महिनावरून वाढवून 18000 रुपये करण्यात आला.
तर उच्च स्तर म्हणजे सचिवांना 90,000 रूपये वाढवून 2.5 लाख रुपये केला गेला.
क्लास 1 अधिकार्‍यांसाठी प्रारंभिक वेतन 56,100 रूपये होते.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor increase basic salary to rs 26000 from 18000 pm narendra modi government cabinet meeting in next two days

Pune Crime | लोणावळ्यात इंजिनिअर तरूणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्या

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी उमेदवार ठरला ! संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब ?; जाणून घ्या सेनेच्या जिल्हा प्रमुखाबाबत

Related Posts