IMPIMP

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold price today fall down by 62 rupees check chhath puja days gold rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | दिवाळीपूर्वी मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत सतत तेजी नोंदली जात आहे. सणासुदीच्या काळात (Festive Season) भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 19 ऑक्टोबर 2021 ला सुद्धा सोन्याच्या दरात (Gold Price Today) उसळी आली. तर, चांदीच्या दरातही (Silver) आज तेजी नोंदली गेली आहे.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,324 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 62,140 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात तेजी आली, तर चांदीच्या दरात किरकोळ (Gold Price Today) बदल झाला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सोन्याचे आजचे नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 256 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली.
यातून राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,580 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला.
मात्र, अजूनही सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे. कारण त्याचा सध्याचा दर सर्वोच्च स्तराच्या तुलनेत खुप खाली आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर होते.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत उसळी नोंदली गेली आणि ते 1,782 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत आज वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर अवघ्या 188 रुपयांच्या तेजीसह 62,328 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही. तो 23.72 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

Web Title : Gold Price Today | gold price today jumped silver also rallies check update prices on 19 october 2021 marathi news

हे देखील वाचा :

National Pension Scheme | NPS मध्ये मिळतात 3 प्रकारचे इन्कम टॅक्स बेनिफिट, जाणून घ्या कशाप्रकारे देतात फायदा

Pune News | बिबवेवाडीतील ESIC रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करणार; केंद्रीय मंत्री डॉ. भूपेंद्र यादव यांचे आश्वासन

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Related Posts