IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold-Silver Rate Today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने दरात मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या घसरणीवर काहीसा लगाम लागला आहे. सोमवारी सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) काही प्रमाणात वाढले असल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,150 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि जागतिक सराफा बाजारात (World Bullion Market) सोन्या-चांदीच्या किंमती सध्या वाढल्या असल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून त्यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्याचबरोबर सोन्यात गुंतवणूक (Investment) करण्यासाठीही ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये (Multi Commodity Exchange) सोन्याच्या भावात वाढ झाली, तर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.

सोन्याच्या किमतीतील बदल –

‘ग्लोबल इक्विटी मार्केट्समध्ये तीव्र सेल-ऑफ दिसत आहे. त्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. या व्यतिरिक्त, वाढीच्या मंदावलेल्या लक्षणांमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे जाण्यास प्रवृत्त झाले आहेत. सध्या लग्नसराई पाहाता सोन्याच्या मागणीतही वाढ होताना दिसत आहे. या दरम्यान, राज्यातील प्रमूख शहरातील सोन्याचा दर काय आहे? याबाबत जाणून घ्या.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,480 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,430 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,480 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,480 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,100 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price in maharashtra 24 may 2022 mumbai pune nagpur nashik

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

Related Posts