IMPIMP

Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या

by nagesh
Link Ration Card With Aadhaar | link your ration card with aadhar immediately before deadline or else you will lose free ration scheme

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Link Ration Card With Aadhaar | शिधापत्रिका (रेशन कार्ड – Ration Card) हे भारतीय सामान्य नागरीकांचे एक महत्वाचे कार्ड आहे. या कार्डधारकाला रेशनिंग लागू झाल्यानंतर युद्धाच्या वेळी किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अल्प प्रमाणात उपलब्ध असलेले अन्न किंवा इतर वस्तू मिळण्याची सुविधा देते. असंच कोरोनाच्या महामारीत गरिबांची परिस्थिती पाहता सरकारने मोफत रेशन योजना (Free Ration Plan) सुरू केली. दरम्यान सरकार रेशन कार्डबाबत वेळोवेळी अपडेट देत असते. आता एक नवीन नियम सरकारने (Link Ration Card With Aadhaar) केला आहे.

रेशनची सुविधा घेणाऱ्यांना रेशन कार्ड आणि आधार लिंक (Aadhaar Card) करण्याचा नियम करण्यात आला आहे. याअगोदरही तुम्हाला याबाबत माहिती सरकारनं दिली होती. यापूर्वी याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. पण, शेवटच्या दिवशी ती वाढवून 30 जून (30 June) करण्यात आली. जर तुम्ही आधार आणि रेशन कार्ड लिंक केले नसेल तर लवकर करणे आवश्यक आहे. लिंक न केल्यास तुमची मोफत रेशन सुविधा बंद होऊ शकते. (Link Ration Card With Aadhaar)

दरम्यान, ‘वन कार्ड, वन नेशन’ (One Card, One Nation) योजनेंतर्गत, तुम्ही कोणत्याही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रेशन घेण्यास अधिकृत आहे. पुढील काळात संपूर्ण व्यवस्थेत जादा पारदर्शकता अपेक्षित आहे. रेशन कार्ड आधारशी लिंक न केल्यास पुढील काळामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.

असं लिंक करा आधार – रेशन कार्ड –

सर्वप्रथम आधार वेबसाइट uidai.gov.in सुरु करा.

येथे ‘Start Now’ वर क्लिक करा.

येथे, तुमचा पत्ता आणि जिल्हा इत्यादी तपशील भरा.

यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ पर्यायावर क्लिक करा.

येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इ. प्रविष्ट करा.

ते भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.

तुम्ही OTP भरताच, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे आधार पडताळले जाईल. तसेच आधार आणि रेशन कार्ड लिंक केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे –

आधार कार्डची प्रत

शिधापत्रिकेची प्रत

शिधापत्रिकाधारकासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो

आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन रेशन कार्ड

Web Title :- Link Ration Card With Aadhaar | link your ration card with aadhar immediately before deadline or else you will lose free ration scheme

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट; प्रकृती स्थिर

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

PM Awas Yojana | पीएम आवास योजनेंतर्गत मिळणार तिप्पट जादा रक्कम ?; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन

Related Posts