IMPIMP

Modi Government | शेतकर्‍यांना मोदी सरकार दर महिना देते 3000 रुपये, केवळ करावे लागेल ‘हे’ छोटे काम? जाणून घ्या

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | देशात कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी मोदी सरकार (Modi Government) अनेक योजना राबवत आहे. याच योजनांपैकी एका आहे सरकारची पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Scheme). या योजनेतून सरकारी नोकरी करणार्‍या लोकांप्रमाणेच शेतकर्‍यांना सुद्धा दर महिना पेन्शन मिळते. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत 60 वर्षांच्या वयानंतर पेन्शनची तरतूद आहे. या योजनेत 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत कुणीही शेतकरी भाग घेऊ शकतो. या पेन्शन निधीचे व्यवस्थापन भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) करत आहे.

दर महिना मिळते 3000 रुपयांची पेन्शन

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. या योजनेत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल.

काय आहे योजना जाणून घ्या

या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल. यातून त्यांना वृद्धपकाळ सुरक्षित करण्यात मदत होते. सरकार पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता.

असे करा मोफत रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल. यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

इतक्या रुपयांपासून सुरू करू शकता

18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल.
तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.
जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल.
असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल.

जर मध्येच बंद करायची असेल योजना

जर एखाद्या शेतकर्‍याला मध्येच योजना सोडायची असेल तर त्याचे पैसे बुडणार नाहीत.
त्याचे योजना सोडेपर्यंतच्या जमा पैशांवर सेव्हिंग अकाऊंट इतके व्याज मिळेल.
जर पॉलिसी होल्डर शेतकर्‍याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहील.

Web Title : Modi Government | farmer get rs 3000 per month pension under pm kisan maan dhan scheme check how can you get

हे देखील वाचा :

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

Gold Price Today | ‘या’ आठवड्यात सुद्धा स्वस्त झाले सोने, आता 9051 रुपये कमी दरात खरेदी करा 10 ग्रॅम; जाणून घ्या भाव

Earn Money | नोकरी सोडून 2 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, थेट 4 लाखाचा होईल नफा; सरकार देईल आर्थिक मदत

Related Posts