IMPIMP

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 4000 रुपये, परंतु 30 सप्टेंबरपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

by nagesh
PM Kisan | good news pm kisan beneficiaries will get credit of rs 4000 instead of 2000 in 10th installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM-kisan Samman Nidhi) लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो. दरम्यान, जे शेतकरी PM-kisan Samman Nidhi चा लाभ घेत नाहीत, ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

जर शेतकर्‍याचा अर्ज आता स्वीकारला गेला तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये 2000 रुपये खात्यात येतील.
यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा 2000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात येईल.
म्हणजे जर तुम्हाला 4000 रुपये मिळवायचे असतील तर तुमच्याकडे 30 सप्टेंबरपर्यंतची चांगली संधी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते (government can double the amount of PM Kisan Yojana).
शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये दिले जातील, म्हणजे त्यांना दर चार महिन्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

– सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

– यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

– नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

– यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

– नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

– आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

वार्षिक 6000 रूपये दिले जातात

मीडिया रिपोर्टनुसार बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. बिहारच्या कृषी मंत्र्यांनुसार, सरकार पीएम किसान सम्मान निधीची रक्कम दुप्पट केली जाणार आहे, यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मात्र, हा केवळ मंत्र्यांचा दावा आहे, सरकारकडून असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. सध्या या योजनेत शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रूपये दिले जातात.

Web Title : PM-Kisan | 4k rupees will come in the account of pm kisan beneficiaries do registration before 30 sept check process

हे देखील वाचा :

SBI नं जारी केला अलर्ट ! 15 सप्टेंबर रोजी 2 तासांसाठी बंद राहणार बँकिंग सेवा, व्यवहारांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळ

Bad Habits For Health | जर तुमच्यात सुद्धा असतील ‘या’ 4 वाईट सवयी तर तात्काळ बदला, भविष्यात होऊ शकतो आरोग्याला धोका

Pravin Darekar | ‘थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही’

Related Posts