IMPIMP

RBI Issued Fraud Alert | तुम्ही देखील ‘हे’ नंबर कोणासोबत शेअर केलेत? तर मग व्हा सावध, RBI नं जारी केला अलर्ट; जाणून घ्या

by nagesh
RBI | rbi issued important notice all bank customers check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RBI Issued Fraud Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा फसवणुकीबाबत इशारा जारी केला आहे. केंद्रीय बँकेने ग्राहकांना सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन फ्रॉडपासून (RBI Issued Fraud Alert) सावध केले आहे. सोबत आपली वैयक्तिक माहिती कुणासोबत शेयर करण्यास मनाई केली आहे.

यापूर्वी सुद्धा आरबीआयने जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीबाबत ग्राहकांना सावध केले होते. सायबर गुन्हेगार अनेक प्रकारे लोकांची फसवणुक करत आहेत. या फसवणुकीपासून कसा बचाव करता येईल ते जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आरबीआयने हे क्रमांक शेयर करण्यास केली मनाई

आरबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत ग्राहकांना म्हटले आहे की, आपली बँकेची माहिती जसे की, पिन (Pin Number), सीव्हीव्ही (CVV), ओटीपी (OTP) कुणासोबत सुद्धा शेयर करू नका.

अशाप्रकारे होते फसवणूक

सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी बँक किंवा फायनान्शियल कंपनीचा टोल फ्री नंबर 1800
123 1234 (हा खरा क्रमांक नाही) सोबत मिळता-जुळता (800 123 1234) नंबर प्राप्त करतात.
ज्यानंतर आरोपी हा नंबर ट्रू कॉलर किंवा इतर अ‍ॅप्लिकेशनवर बँक किंवा फायनान्शियल कंपनीच्या
नावाने रजिस्टर्ड करतात.

अशावेळी जेव्हा तुम्ही बँकेला ट्रू कॉलरच्या मदतीने फोन करता तेव्हा अनेकदा हा फोन सायबर
गुन्हेगारांकडे जातो आणि ते तुमच्याकडून सर्व माहिती घेऊन सायबर गुन्हा घडवून आणतात.

फसवणुकीपासून असा करा बचाव

जर तुम्हाला बँकेत किंवा फायनान्शियल कंपनीत फोन करायचा असेल तर त्यांच्या ट्रोल फ्री नंबरची
संपूर्ण माहिती घ्या. तसेच कोणत्याही टोल फ्री नंबरवर आपल्या बँकेची माहिती शेयर करू नका.

Web Title : rbi issued fraud alert for customers says avoid these things know about it

हे देखील वाचा :

Ayurveda Expert Balaji Tambe | आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांचे निधन कोरोनाने?

Pune Crime | तुझी ‘गारवा हॉटेलमालका’सारखी गत होईल; जमिनीच्या वादातून धमकी देणार्‍या 5 जणांवर FIR दाखल

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या 10.30 टक्क्यांवरून वाढवून 33 % करण्याचे निर्देश

Related Posts