IMPIMP

Afghanistan Crisis | ’आम्ही हळु-हळु मरून जाऊ…’ अफगाणमध्ये बिघडलेल्या स्थितीवर आश्रूंना वाट करून देणार्‍या मुलीचा हृदयद्रावक व्हिडिओ वायरल

by nagesh
Afghanistan Crisis | afghanistan taliban crisis heartbreaking video of afghan girl in tears goes viral

काबुल : सरकारसत्ता ऑनलाइन Afghanistan Crisis | अफगाणिस्तान मध्ये सुमारे दोन दशकानंतर पुन्हा एकदा तालिबान (Taliban) चा प्रभाव वाढला आहे. दक्षिण आशियातील या देशाची बिघडलेली स्थिती (Afghanistan Crisis) अनेक व्हिडिओद्वारे समोर आली आहे, येथे लोक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे नुकताच एका छोट्या अफगाण मुलीचा सुद्धा व्हिडिओ (video of a Afghan girl) समोर आला आहे, यामध्ये ती सांगते की, जग अफगाणिस्तानसोबत कसं वागत आहे (How the world is dealing with Afghanistan). ती असेही म्हणत आहे की, युद्धाने जळणार्‍या या देशाच्या स्मृती लवकरच पुसल्या जातील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

इराणी पत्रकार मसीह अलीनेजाद (Iranian journalist Masih Alinejad) ने शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर केला होता. तिने कॅपशनमध्ये लिहिले, नाउमेद झालेल्या अफगाण मुलीचे आश्रू (The tears of a desperate Afghan girl), जिची स्वप्न भंगली आहेत. कारण तालिबान देशात पुढे सरकत आहे. अफगाणिस्तानच्या महिलांसाठी (women of Afghanistan) माझे हृदय पिळवटून निघतेय. जगाने त्यांना अयशस्वी करून टाकले. इतिहास हे लिहिणार आहे. व्हिडिओमध्ये मुलगी म्हणत आहे, आमची मोजदाद होणार नाही, कारण आम्ही अफगाणिस्तानातील आहोत. आम्ही इतिहासातून हळु-हळु नष्ट होऊ.

सुमारे 45 सेकंदाच्या या व्हिडिओ (45 seconds video of afgan girl ) मध्ये मुलगी सतत रडताना दिसत आहे. ती म्हणत आहे, मी रडणे बंद करू शकत नाही.
हा व्हिडिओ करण्यासाठी मला माझे आश्रू पुसावे लागतील.
कुणीही आमच्यासाठी चिंता करत नाही. आम्ही इतिहासात हळु-हळु मरून जाऊ.
ही थट्टा नाही हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक सतत त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अफगाणिस्तानात आपल्या शासनकाळात तालिबानने महिलांना घराच्या बाहेर काम करण्यास किंवा शाळेत जाण्यास बंदी घातली होती.
महिला आपल्या पुरुष नातेवाईकांसोबत बाहेर पडू शकत होत्या आणि त्यांना त्यावेळी बुरखा घालणे सुद्धा बंधनकारक होते.
आता लोकांना भिती आहे की दोन दशकांमध्ये मिळालेले स्वातंत्र्य तालिबान आल्याने नष्ट होणार आहे. सोबतच एनजीओ कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या काम करण्यावर सुद्धा प्रतिबंध लावले जातील.

संयुक्त राष्ट्राचे आकडे सांगतात की, तालिबानकडून इस्लामचे कठोर नियम लागू करण्याच्या भितीने मेच्या अखेरपासून आतापर्यंत सुमारे 2 लाख 50 हजार अफगाण नागरिक आपले घर सोडून पळाले आहेत.

Web Title : Afghanistan Crisis | afghanistan taliban crisis heartbreaking video of afghan girl in tears goes viral

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात पुन्हा लागू शकतो लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

Related Posts