IMPIMP

Afghanistan Crisis | रक्तपात टाळण्यासाठीच अफगाणिस्तानातून पलायन; फेसबूक पोस्टद्वारे अश्रफ घनीनीं केला खुलासा

by nagesh
Afghanistan Crisis | ashraf ghani write facebook post tells reason why he left country

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Afghanistan Crisis | तालिबान्यांनी (taliban) तब्बल २० अफगाणिस्तानवर ताबा (Afghanistan Crisis) मिळवला आहे. रविवारी कबुलमध्ये प्रवेश करता तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतले. या सर्व घडामोडी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देशातून पलायन केले. त्यांच्या या भूमिकेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर घनी यांनी विश्वासघात केल्याचे म्हंटले. एकूणच परिस्थिती बिकट झाली असताना घनी यांनी पलायन कोठे केले हा प्रश्न अनुत्तरीतच होता. मात्र आता खुद्द अश्रफ घनी (ashraf ghani) यांनीच फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) देश का सोडला याचे कारण सांगितले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अल जझीरा या वृत्तवाहिनीने घनींच्या वैयक्तिक अंगरक्षकाचा हवाला देत म्हटले की,
घनी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर घनी, त्यांची पत्नी, त्यांचे मुख्य कर्मचारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेजारील उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आहेत.
काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर रक्तपात टाळण्यासाठी देशातून पलायन केल्याचे घनी यांनी म्हंटल आहे.

घनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, गेल्या वर्ष भराच्या युद्धानंतर लाखो रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आणून त्यांना कठीण निर्णयाचा सामना करावा लागला आहे.
रक्तपात करण्यापेक्षा देश सोडणे चांगले असे मला वाटले.
तलवार आणि बंदुकीच्या जोरावर तालिबान्यांनी कब्जा मिळवला.
देशबांधवांच्या सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी होती.
मात्र रक्तपात करणे योग्य नाही.
म्हणूनच देश सोडावा लागला.

तालिबान्यांनी अमेरिका आणि नाटो फौजा यांनी माघार घेताच आठवडाभरातच अफगाणिस्तानावर कब्जा मिळवला.
बंडखोरांनी संपूर्ण देशावर ताबा मिळवला.
काबूलमध्ये प्रवेश करत तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतले.
राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनाही देशाबाहेर जावे लागले.
तालिबानी अफगाणिस्तानावर कब्जा केल्याची घोषणा कोणत्याही क्षणी करू शकतात तसेच अफगाणिस्तानच्या नामांतराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तालिबानी

इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) असं अफगाणिस्ताच नामांतर करण्याची शक्यता आहे. जवळपास २० वर्षे अमेरिका आणि नाटो यांनी अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.
मात्र तरीही अवघ्या आठवड्याभरातच तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

Web Title : Afghanistan Crisis | ashraf ghani write facebook post tells reason why he left country

हे देखील वाचा :

Haiti Earthquake | ‘हैती’त भूकंपाचं तीव्र पडसाद, अनेक इमारती जमीनदोस्त तर आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू

Vinayak Raut | ‘नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही’

PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

Related Posts