IMPIMP

Ministry of Home Affairs | दुसर्‍या लाटेपेक्षा सुध्दा भयंकर असू शकते तिसरी लाट

by omkar
Ministry of Home Affairs

दिल्ली : वृत्तसंस्था- आता कोरोना (Coronavirus) कर्फ्यूचे प्रतिबंध देशातील बहुतांश राज्यात हटवण्यात आले आहेत. बाजार (Market) , शॉपिंग मॉल(Shopping Mall ), रेस्टॉरंटसह (Restaurant), मेट्रो (Metro) आणि इतर वाहतूक (Transport) व्यवस्था पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. परंतु अचानक देण्यात आलेल्या या सवलतीनंतर देशातील राज्यांमध्ये जे वातावरण आहे ते पाहून गृह मंत्रालया (Ministry of Home Affairs) ची चिंता वाढली आहे.

Ram Temple Scam | ‘आरोप करणार्‍यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा’

दरम्यान, बुधवारी गृह मंत्रालय आणि आरोग्य विभागा (Health Department) च्या अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.
यानंतर देशभरातील सर्व राज्यांना आरोग्य मंत्रालयाकडून निर्देश जारी करण्यात आले की, सूट मिळाली आहे परंतु कोविड (Covid) प्रोटोकॉलचे पूर्ण पालन झाले पााहिजे.
आरोग्य मंत्रालया (Ministry of Health) च्या अधिकार्‍यांनी सुद्धा या बैठकीत सांगितले जर स्थिती निष्काळजीपणाची राहीली तर तिसरी लाट खुपच भयंकर असू शकते.

EPFO | नोकरी सुटल्यानंतर सुध्दा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

कोविड प्रोटोकॉलचे पालन न करणार्‍यांवर कठोर कारवाई

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाला या गोष्टीची शंका आहे की, ज्या प्रकारे अचानक रस्त्यांवर गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहेत.
त्यामुळे नियंत्रणात येत असलेल्या कोरोना प्रकरणांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी याबाबतची चिंता आरोग्य मंत्रालय आणि देशातील इतर राज्यांच्या मुख्य सचिवांकडे सुद्धा व्यक्त केली आहे.
गृहमंत्रालयाने आरोग्य मंत्रालयासह देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहे की, कोविड प्रोटोकॉलचे पालन न करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

विशेषता जे लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत आणि मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जावी.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनुसार आयसीएमआर आणि कोरोनावर अभ्यास करणार्‍या संस्थांनी अगोदरच सावध केले आहे की जर आपण मिळालेल्या सवलतीसह कोविड प्रोटोकॉलचे पालन केले नाही. तर स्थिती खुपच बिघडू शकते.
या महामारीवर लस हाच एक उपाय आहे.आणि आपल्याकडे अजूनही लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले नाही.
अशावेळी वेळी रस्त्यांवर निघालेली गर्दी तिसर्‍या लाटेला निमंत्रण देत आहे.
मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनुसार आज सुद्धा आपल्या देशात अवघ्या ५ टक्के लोकांनाच लस दिली गेली आहे.

Barshi | बार्शीच्या मयूरने शोधला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने दिले लाखोंचे बक्षीस

Related Posts