IMPIMP

Kabul Airport | काबूल विमानतळाबाहेर 2 स्फोट; 70 जणांचा मृत्यू

by nagesh
Kabul Airport | explosion outside kabul airport 70 dead

काबूल : सरकारसत्ता ऑनलाइन Kabul Airport | तालिबाननं अफगाणिस्तानवर  कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. गुरुवारी संध्याकाळी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर (Kabul Airport) दोन स्फोट घडवून आणले आहेत. या स्फोटात ७० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एएनआयनं  अमेरिकेच्या संरक्षण सचिवांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान या स्फोटाची जबाबदारी  ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पहिला स्फोट काबूल विमानतळाच्या अँबे गेटजवळ तर दुसरा स्फोट काबूलच्या एका हॉटेलजवळ झाला आहे.  पँटॅगॉननं दिलेल्या माहितीनुसार काबूल विमानतळाबाहेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे  प्रयत्न सुरु असून या स्फोटांमुळं तिथल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आत्मघाती हल्लेखोरानं काबूल विमानतळाच्या अँबे गेटच्या बाहेर  हा स्फोट घडवून आणला. हल्लेखोर फायरिंग करत आला आणि त्यानं स्वतःला बॉम्बनं उडवून दिलं. ऑस्ट्रेलियाचे सैनिक या गेटवर तैनात असतात. इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या काही काळापूर्वीच  स्फोटाची धमकी दिली होती. बाहेरच्या सैनिकांना निशाणा बनवणं  या स्फोटाचा हेतू हा होता. जे अफगाणी शरणार्थींना देशाबाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.

Web Title : Kabul Airport | explosion outside kabul airport 70 dead

हे देखील वाचा :

Mobile SIM | तुमच्या Aadhar card वरून किती मोबाइल SIM Card आहेत सुरू? ‘टॅफकॉप’द्वारे एका क्लिकवर मिळवू शकता माहिती; जाणून घ्या

Pune Crime | ‘गट्ट्या आव्हाळेला नडतोस काय’ म्हणत टोळक्यांने तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

Related Posts