IMPIMP

Pulwama Attack 2019 : ‘हल्ल्याबद्दलच्या गुप्त माहितीकडे PM मोदींनी दुर्लक्ष का केलं ?, राहुल गांधींचा प्रश्न

by sikandershaikh
modi-Rahul-gandhi-Angry

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुलवामा दहशतवादी हल्ल्याला (Pulwama Attack) नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिलं की, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे आपल्या जवानांना मरण्यासाठी सोडून दिलं. पुलवामा येथे हल्ला होणार याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती. असं असतानाही मोदींनी त्याकडं लक्ष दिलं नाही. गुप्त माहितीवर वेळीच कारवाई करायला हवी होती. त्याकडं कानाडोळा का केला असा प्रश्नही राहुल गांधींनी केला आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे CRPF जवानांच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ला (Pulwama Attack) झाला होता. यात 40 जवांना हौतात्म्य आलं तर अनेक जण जखमी झाले होते. पूर्ण देश या घटनेनं हळहळला होता. या दिवशी पीएम मोदी डिस्कव्हरी वाहिनीसाठी बियर ग्रिल्स सोबत भारतीय जंगलात चित्रीकरण करत होते. यावरून विरोधकांनी मोदींवर सडकून टीका केली होती.

Related Posts