IMPIMP

Sana Gulwani | 27 वर्षीय हिंदू मुलीने पाकिस्तानात रचला इतिहास; पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय सेवा परीक्षा पास

by nagesh
Sana Gulwani | sana gulwani made history hindu girl pakistan was done sana who crack css exam in pakistan

इस्लामाबाद : वृत्तसंस्था Sana Gulwani | पाकिस्तानातील हिंदूंच्या प्रशंसनीय कामाचं भारतात नेहमीच कौतुक केलं जातं. आताही २७ वर्षीय एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. तिने यूपीएससी दर्जाची पाकिस्तनातील सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेसची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. सना रामचंद्र गुलवानी (Sana Gulwani) असे या मुलीचं नाव आहे. याबाबतचे वृत्त एक्सप्रेस ट्रिब्युनने दिले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पाकिस्तानातील ही परीक्षा अतिशय अवघड असते. २ टक्के पेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे.
पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेतील नियुक्तींची सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेस परीक्षा असून भारतातील युपीएससी (UPSC) दर्जाची तुलना या परीक्षेसोबत करता येईल.
सिंध प्रांतातील रुरल जागेतून सनाने या परीक्षेत सहभाग घेतला होता.
पाकिस्तान प्रशासकीय सर्व्हिसेसच्या अंतर्गत ही जागा भरण्यात येते.
परीक्षा पास झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सना म्हणाली, जे मी स्वप्न पाहिले ते सत्यात उतरलं आहे.
पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं असल्याचे तिने सांगितले.

तर सनाच्या (Sana Gulwani) पालकांची तिने वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करावे, अशी इच्छा होती. त्यामुळेच तिने प्रशासकीय सेवेत जाऊ नये असे त्यांना वाटते.
सनाने आई-वडिलांची इच्छा आणि स्वत:चं स्वप्नही पूर्ण केलं आहे.

पाच वर्षांपूर्वी सनाने शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिन विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्या सर्जन बनल्या.
प्रशासकीय सेवेची तयारी युरोलॉजीमध्ये मास्टर डिग्री घेतल्यानंतर त्यांनी सुरू करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

Web Title : Sana Gulwani | sana gulwani made history hindu girl pakistan was done sana who crack css exam in pakistan

हे देखील वाचा :

Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं; जिल्ह्यात प्रंचड खळबळ

Pune Anti Corruption | पुण्यातील दोन पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्याच्या महिला पत्रकाराचा पोलीस ठाण्यात ‘राडा’ !

Related Posts