IMPIMP

तीरथ सिंह रावत यांचे 4 वर्षांपूर्वी कापले होते तिकीट; आता भाजपनं दिलं मुख्यमंत्रिपद

by amol
uttarakhand politics bjp political career chief minister tirath singh rawat

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे नेते तीरथ सिंह रावत Tirath Singh Rawat यांची निवड झाली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता तीरथ सिंह रावत यांची नियुक्ती झाली आहे. तीरथ सिंह हे 2017 मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

तीरथ सिंह रावत Tirath Singh Rawat यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेतला नाही. त्यांनी ना पक्ष सोडला ना बंडखोरी केली. पक्षाशी एकनिष्ठ राहिले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत तीरथ सिंह रावत Tirath Singh Rawat यांना उमेदवारी नाकारत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या सतपाल महाराज यांना तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी नाराजी दाखवली नाही. सतपाल महाराज यांना विजयी करण्यासाठी त्यांनी मोठा वाटा उचलला. त्यामुळे त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. त्यामध्ये त्यांचा विजयही झाला. त्यानंतर आता त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.

तीरथ सिंह रावत यांनी राजकीय कारकिर्दीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुरुवात केली.
त्यांनी बी. एस. खंडुरी यांच्या मार्गदर्शनात राजकारण शिकले.
खंडुरी यांनी पौडी-गढवाल मतदारसंघातून जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली.
तेव्हा त्यांनी निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली.

राष्ट्रीय सचिवपद

तीरथ यांना संघटनेत राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
त्यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशचे प्रभारी बनवले.
चौबट्टाखाल सीटवर सतपाल महाराज यांना त्यांनी जिंकून देण्याचा महत्त्वाचा वाटा उचलला होता.
तीरथ सिंह रावत यांनी बी. एस. खंडुरी यांचा मुलगा मनीष खंडुरी यांचा तीन लाख मतांनी पराभूत केला होता.

Assembly Election 2021 : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला ‘राम राम’

Related Posts