लखनऊ : सरकारसत्ता ऑनलाइन – एका तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या Suicide केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लखनऊमध्ये घडली आहे. तसेच घटनास्थळी एक सुसाइड नोटसुद्धा मिळाली आहे. या सुसाइड Suicide नोटमध्ये तरुणाने लखनऊमध्ये तैनात असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. केसमध्ये अडकवून त्याला तुरुंगात पाठवण्याचा आरोप या तरुणाने केला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी मृत तरुणाने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
या तरुणाने पोलिसांना फोन करून हसनगंजच्या विवेकानंद हॉस्पिटलच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या तरुणाचे नाव विशाल सैनी आहे. तो सचिवालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. तसेच, रविदास मंदिराजवळ राहत होता. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नॉर्थ झोनमध्ये तैनात आयपीएस अधिकारी प्राची सिंह यांच्यावर खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
१३ फेब्रुवारीला आयपीएस अधिकारी प्राची सिंह यांनी इंदिरानगरमध्ये स्टाइल इन दी ब्यूटी सलून आणि स्पा सेंटरवर धाड टाकली होती. त्यामध्ये त्यांनी ५ महिलांना ताब्यात घेतले होते. तसेच मृत विशाल सैनीलाही अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला मानसिक त्रास झाल्याचे सांगण्यात आले आहे.
काय लिहिले आहे सुसाइड नोटमध्ये?
‘मी आत्महत्या Suicide करीत आहे, यासाठी जबाबदार आयपीएस प्राची सिंह आहेत, त्यांनी माझे करिअर खराब केले आहे आणि मी समाजात तसेच कुटुंबीयांच्या नजरेसमोर उभा राहू शकत नाही. त्याचा मला त्रास होत आहे. तसेच, निरपराध लोकांना तुरुंगात पाठवू नये, असेही त्याने म्हटले आहे. याचबरोबर, ‘आयपीएस प्राची सिंह यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, पदोन्नतीच्यावेळी अनेक निरपराध लोकांना शिक्षा केली, मी निर्दोष होतो, माझी प्राची सिंह यांनी सेक्स रॅकेटमध्ये फसवणूक केली’, असे विशाल सैनी यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
या सुसाइड Suicide नोटनंतर विशाल सैनीकडून करण्यात आलेले आरोप निराधार आहेत, असे पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी सांगितले आहे. पण विशाल सैनीकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल
लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?
फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा