IMPIMP

WHO चा भारताला इशारा ! डेल्टा व्हेरिएंटचा उल्लेख करून म्हटले – ‘घाईगडबडीत हटवू नयेत प्रतिबंध’

by omkar
Coronavirus | who said the covid19 virus was in the epidemic category

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – वृत्त संस्था – जागतिक आरोग्य संघटना (WHO) चीफ टेड्रॉस अधानोम गेब्रयासस यांनी कोरोना प्रतिबंध लवकर हटवण्याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की
-डेल्टा व्हेरिएंटसह (Delta Variant) अन्य ’चिंताजनक’ व्हेरिएंट्सचा वाढता संसर्ग पाहता कोरोना प्रतिबंध लवकर हटवणे धोकादायक ठरू शकते.
त्यांनी म्हटले – ज्या लोकांनी व्हॅक्सीन अजूनपर्यंत घेतलेली नाही त्यांच्यासाठी प्रतिबंध शिथिल करणे धोकादायक ठरू शकते.

शिरूर महसुल अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर अखेर LCB कडून अटकेत; 7 महिन्यापासून होता फरार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी सुमारे दोन महिन्यापर्यंत वाईट प्रकारे सामना केल्यानंतर भारतात प्रतिबंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे.
काही राज्यांनी प्रतिबंध हटवले आहे तर काही ठिकाणी अजूनही प्रतिबंध आहेत.

डेल्टा स्ट्रेन आता चिंतेचे कारण
यापूर्वी डब्ल्यूएचओने म्हटले होते की, कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन (Delta Variant) आता चिंतेचे कारण बनत आहे. कोविडचा हा स्ट्रेन सर्वप्रथम भारतात आढळला होता. या व्हेरिएंटच्या दोन अन्य स्ट्रेन्ससंबंधी डब्ल्यूएचओने म्हटले की, सध्या चिंतेची बाब नाही.
व्हायरसचा बी.1.617 व्हेरिएंट ट्रिपल म्यूटेंट व्हेरिएंट असल्याचे म्हटले आहे, कारण हा तीन लिनीएज (वंश) मध्ये विभागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजन्सीने मागील महिन्यात पूर्ण स्ट्रेन ’व्हीओसी’ म्हणजे व्हेरिएंट ऑफ कन्सर्न घोषित केला होता.

वेगाने पसरू शकतो हा व्हेरिएंट – डब्ल्यूएचओ
कोरोना व्हायरसचे भारतात पहिल्यांदा आढळलेले स्वरूप बी.1.617.1 आणि बी.1.617.2 ला आतापासून अनुक्रमे ‘कप्पा’ तथा ‘डेल्टा’च्या नावाने ओळखले जाईल.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरसच्या विविध स्परूपांच्या नामावलीच्या नवीन व्यवस्थेची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत व्हायरसच्या विविध स्परूपांची ओळख ग्रीक भाषेच्या अक्षरांद्वारे होईल.
हा निर्णय व्हायरसबाबत सार्वजनिक चर्चा सुरळीत करणे तसेच नावांवर लागलेला कलंक घालवण्यासाठी घेतला आहे.

Web Title : WHO says only one strain of COVID Delta variant ‘of concern’

Also Read:- 

PM मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना !

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

Related Posts