IMPIMP

काय सांगता ! होय, नसबंदी केल्यानंतर देखील महिला राहिली 5 व्यांदा गर्भवती, केला 11 लाखाच्या नुकसान भरपाईसाठी दावा

by pranjalishirish
woman-becomes-sterilization-pregnant-fifth-time-doctor-mistake-demanded-11-lakhs-rupees-muzaffarpur in bihar

पटना : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये नसबंदी करूनही एक महिला पाचव्यादा गर्भवती Pregnant राहिल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर या महिलेनं थेट डॉक्टरविरोधात ग्राहक मंचमध्ये गुन्हा दाखल केला असून ११ लाखाची नुकसान भरपाईदेखील मागितली आहे. यावर आता १६ मार्चला सुनावणी होणार आहे. आरोग्य विभागातील प्रधान सचिवाविरोधातही या महिलेनं गुन्हा दाखल केला आहे.

आधीच आचार मुलांचा सांभाळ करणे अशक्य होत असताना कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मोतीपूर ब्लॉक अंतर्गत शासकीय रुग्णालयात फुलकुमारी यांनी २७ जुलै २०१९ मध्ये नसबंदी केली. यावेळी त्यांनी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले. मात्र दोन वर्षानंतर पाचव्या वेळी गर्भवती Pregnant झाल्याचे फुलकुमारी यांनी सांगितले.

महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आधी चार मुले आहेत त्यांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागते. अशात ती आता पुन्हा एकदा गर्भवती Pregnant झाली आहे. यातून निकृष्ट सरकारी प्रणाली दिसून येते. असे महिलेचे वकील असलेल्या एस.के.झा यांनी म्हंटले आहे. जिल्हा ग्राहक आयोगात याप्रकरणी दावा दाखल करण्यात आला असून १६ तारखेला सुनावणी होणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांव्यतिरिक्त अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार नसबंदी करूनही दोन वर्षांनंतरही गर्भवती Pregnant राहिल्याने कुटुंबात निराशा पसरली आहे. यासंदर्भात मोतीपूर रूग्णालयात तक्रार केली तेव्हा अल्ट्रासाऊंड करण्यात आलं. ज्यामध्ये ती गरोदर असल्याची खात्री झाली. यानंतर महिला स्वतःच हैराण झाली. जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार नसबंदी करूनही महिला गर्भवती राहिली हे खरे आहे. शस्त्रक्रिया अपयशी ठरतात त्यातीलच हे एक प्रकरण आहे. अशी प्रकरणे समोर येतात, ज्यांना फॉर्म भरल्यावर ३० हजारांची रक्कम दिली जाते. ही रक्कम त्यांनाही दिली जाईल.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts