IMPIMP

Bio Fortified Corn | 250% जास्त प्रोटीन देईल मक्याची नवीन प्रजाती; मांस-अंडे-सप्लीमेंट्सवर राहावे लागणार नाही अवलंबून !

by nagesh
Bio Fortified Corn | bio fortified Corn will give 50 more protein will not have to depend on meat egg supplements bio fortified maize marathi news

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Bio Fortified Corn | शरीरात प्रोटीन (Protein) ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आता मांस (Meat), अंडे, दूधासह महागड्या पावडरवर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या शेतात पिकणार्‍या एका धान्याची विशेष प्रजाती विकसित केली आहे. ज्यातून आपल्या शरीराला जास्त मात्रेत प्रोटीन मिळू शकते. (Bio Fortified Corn)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

बायोफोर्टिफाईड मका विकसित
होय, हे धान्य मका (Maize) आहे. मक्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन, खनिज (मिनरल्स) आणि अँटी-ऑक्सिडेंट सारखी अनेक पोषकतत्व (Nutrients) असतात. परंतु आता भारतीय शास्त्रज्ञांनी मक्याची नवीन प्रजाती (बायोफोर्टिफाईड मका) विकसित केली आहे.

‘मालवीय स्वर्ण मका-वन’
या विकसित मक्यात सामान्य मक्याच्या तुलनेत सुमारे अडीचपट म्हणजे 250% जास्त विशेष प्रकारचे प्रोटीने आढळतात. वाराणसीच्या काशी हिंदू विद्यापीठाच्या (BHU) शास्त्रज्ञांनी विशेष प्रजातीचा मका ‘मालवीय स्वर्ण मका-वन’ नाव दिले आहे. मालवीय जी बीएचयूचे संस्थापक महामना मदन मोहन मालवीय यांना म्हटले जाते.

सामान्यांसाठी प्रोटीनचा मोठा स्त्रोत
बीएचयू (BHU) च्या कृषी विज्ञान संस्थेचा (Institute of Agricultural Sciences) हा मका सामान्यांसाठी प्रोटीनचा मोठा स्त्रोत ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या शास्त्रज्ञांनी शोधली प्रजाती
बायोफोर्टिफाईड (Biofortified) मक्याची विशेष प्रजाती प्रो पीके सिंह (Prof. PK Singh) आणि मका प्रजनन/अनुवंशिक (Maize Breeding/Genetics) चे प्रोफेसर जेपी शाही (Prof. JP Shahi) यांनी मिळून तयार केले आहे. बायोफोर्टिफाईडचा अर्थ रोप प्रजननद्वारे पिकांमध्ये पोषकतत्वाची मात्रा वाढवणे होय.

काय सांगतात जाणकार
प्रो. जेपी शाही Prof. JP Shahi यांच्यानुसार या मक्यातील अमिनो अ‍ॅसिड लायसिन (Amino Acids Lysine) आणि टिप्टोफेन (Tiptophan) मुळे याचे सेवन करणार्‍यांना रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी वेगळ्या आयर्न टॅबलेटची गरज नसेल. हे शरीरात कॅल्शियम आणि रक्त बनवण्याची प्रक्रिया वेगाने करते.

लायसिन आणि टिप्टोफेनचे फायदे
लायसिन (lysine) अ‍ॅथलीट्सची कामगिरी चांगली करण्यासह डायबिटीजमध्ये अतिशय उपयोगी आहे.
हे प्रोटीन रोगप्रतिकारशक्ती (Immune System) चांगली करण्यासह आतड्यांद्वारे कॅल्शियमला अवशोषित करण्याचा दर सुद्धा वाढवते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

बाळांच्या सामान्य विकासासाठी लाभदायक
तर, टिप्टोफेन लहान बाळांच्या सामान्य विकासासह प्रोटीन आणि एंजाइमच्या उत्पादन आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
हे मांसपेशीला मजबूती प्रदान करते. (Bio Fortified Corn)

Web Title :- Bio Fortified Corn | bio fortified Corn will give 50 more protein will not have to depend on meat egg supplements bio fortified maize marathi news

हे देखील वाचा :

Coffee-Alzheimer Disease | जर तुम्हाला सुद्धा आहे वारंवार कॉफी पिण्याची सवय तर राहणार नाही ‘या’ मोठ्या आजाराचा धोका

WhatsApp चे नवीन फीचर ! द्वेष निर्माण करणारे अन् असभ्य-अश्लिल मेसेज पाठवणार्‍यांनी व्हावे सावध, अन्यथा कायमस्वरूपी बॅन

National Apprenticeship Training Scheme | 7 लाख तरूणांसाठी उघडतील रोजगाराचे दरवाजे, ‘ही’ विशेष योजना मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी वाढवली

Related Posts